Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video - अरे व्वा! रस्त्यावर छोटासा स्टॉल ते नवं दुकान; 'वडापाव गर्ल'ची यशस्वी भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 14:15 IST

Chandrika Dixit : रस्त्यावर वडापाव विकून प्रसिद्धीझोतात आलेली चंद्रिका दीक्षितची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

दिल्लीच्या रस्त्यावर वडापाव विकून प्रसिद्धीझोतात आलेली चंद्रिका दीक्षितची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. वडापाव गर्ल म्हणून लोकप्रिय झालेली चंद्रिका बिग बॉसच्या घरात देखील गेली. मात्र आता बिग बॉस ओटीटी ३ मधून बाहेर पडल्यानंतर तिने नवीन दुकान घेतलं आहे.  

नव्या दुकानाचा व्हिडीओ चंद्रिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. तिने तिच्या दुकानाला CDG Vadapav असं नाव दिलं असून दुकानाच्या पाटीवर चंद्रिका दीक्षित गेरा (प्रसिद्ध वडा पाव गर्ल) असंही लिहिलं आहे. बिग बॉसमधून परतल्यानंतर ती तिच्या दुकानात पोहोचली. तिला पाहताच लोकांची झुंबड उडाली. दुकानाबाहेर मोठी गर्दी झाली. 

सोशल मीडियावर वडापाव गर्लच्या दुकानाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हि़डीओमध्ये चंद्रिकासोबत फोटो काढण्यासाठी सगळेच उत्सुक दिसत होते. दुकान फुग्यांनी सजवण्यात आले आहे. चंद्रिकाने तिच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. या यशाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. चंद्रिकाच्या चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला आहे.

बिग बॉस ओटीटी हा शो जिंकला नसला तरी चंद्रिकाने लोकांची मनं जिंकली आहेत. रिॲलिटी शोने तिला अधिक प्रसिद्धी दिली आहे. शोचा भाग झाल्यानंतर चंद्रिका आता मनोरंजन विश्वात येण्याचं स्वप्न पाहत आहे. दिल्लीच्या रस्त्यावर वडापाव विकल्यानंतर बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत चित्रपटांमध्ये नाव कमवायचं आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलबिग बॉस