सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'द कपिल शर्मा' शोमध्ये यावेळी बॉलिवूडची इंडी-पॉप, जॅझ आणि पार्श्वगायिका उषा उथुप आणि पार्श्वगायक सुदेश भोसले येणार असल्याने हा वीकएंड नक्की संगीतमय होणार आहे. ते यावेळी चित्रपट उद्योगातील त्यांच्या गौरवशाली वाटचालीबद्दल कपिल शर्मासोबत गप्पा मारतील. तसेच, त्यांच्या काही सुपरहिट गीतांवर ते प्रेक्षकांना देखील ठेका धरायला लावतील. बॉलिवूड गायकांबद्दल बोलताना उषा उथुपने 1971 मधील हरे राम हरे कृष्ण चित्रपटातील ‘दम मारो दम’ या गीताच्या संदर्भात स्व. संगीतकार आर डी बर्मन आणि अशा भोसले यांच्याबद्दल काही माहीत नसलेल्या गोष्टी सांगितल्या.
'द कपिल शर्मा'शोमध्ये उषा उथुप म्हणाल्या, 'गाने गाने पे लिखा है गाने वाले का नाम'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 07:15 IST
'द कपिल शर्मा' शोमध्ये यावेळी बॉलिवूडची इंडी-पॉप, जॅझ आणि पार्श्वगायिका उषा उथुप आणि पार्श्वगायक सुदेश भोसले हजेरी लावणार आहेत.
'द कपिल शर्मा'शोमध्ये उषा उथुप म्हणाल्या, 'गाने गाने पे लिखा है गाने वाले का नाम'
ठळक मुद्देसुपरहिट गीतांवर ते प्रेक्षकांना देखील ठेका धरायला लावतील