Join us
Daily Top 2Weekly Top 5

​उषा नाडकर्णी झळकणार बिग बॉस मराठीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 11:24 IST

बिग बॉस या कार्यक्रमाचे आजवर आपल्याला अकरा सिझन पाहायला मिळाले आहेत. या कार्यक्रमाचे सगळेच सिझन हिट ठरले आहेत. या ...

बिग बॉस या कार्यक्रमाचे आजवर आपल्याला अकरा सिझन पाहायला मिळाले आहेत. या कार्यक्रमाचे सगळेच सिझन हिट ठरले आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आजवर अर्शद वारसी, शिल्पा शेट्टी, अमितभ बच्चन, फराह खान, सलमान खान आणि संजय दत्त यांनी केले आहे. पण सलमान खान हाच प्रेक्षकांचा लाडका होस्ट आहे. या कार्यक्रमाचा अकरावा सिझन काही महिन्यांपूर्वी पार पडला. या कार्यक्रमाचे विजेतेपद मराठमोळ्या शिल्पा शिंदेला मिळाले होते. बिग बॉसचे विजेतेपद मिळवणारी शिल्पा शिंदे ही पहिली मराठी स्पर्धक ठरली.या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळाल्यानंतर सलमानने शिल्पाला विचारले होते की, तुला आता मराठी बिग बॉसमध्ये जायला आवडेल का? सलमानच्या या प्रश्नावरून बिग बॉस हा कार्यक्रम मराठीत येत असल्याचे सगळ्यांना कळले होते. बिग बॉस हा कार्यक्रम अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना कलर्स या वाहिनीवर पाहायला मिळतोय. हा कार्यक्रम काही दाक्षिणात्य भाषांमध्ये देखील बनवण्यात आला आहे. आता हिंदी आणि दाक्षिणात्य भाषांप्रमाणेच हा कार्यक्रम प्रेक्षकांना मराठीत देखील पाहायला मिळणार असून नुकतीच या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहेत. गेल्या कित्येत दिवसांपासून या कार्यक्रमाचे प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या प्रोमोंना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.बिग बॉस या कार्यक्रमात मराठी सेलिब्रेटी कोण असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या कार्यक्रमात उषा नाडकर्णी यांना आपल्याला पाहायला मिळणार आहे. उषा नाडकर्णी या कार्यक्रमाचा भाग असल्याचे त्यांनी स्वतः टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. त्या सांगतात, मी बिग बॉस मराठीत स्पर्धक म्हणून जाणार आहे. या कार्यक्रमात माझ्या वयाचे कोणतेही स्पर्धक नाहीयेत. खरे सांगू तर या कार्यक्रमात जायला मला थोडीशी भीती वाटत आहे. बिग बॉसमध्ये तुम्हाला तुमच्या फोनशिवाय राहायला लागते. त्यामुळे अनेकांना आपण फोनशिवाय राहू शकतो का याचे टेन्शन असते. पण मला फोनची तितकीशी सवय नसल्याने मला तसे टेन्शन नाहीये.