उर्वशी मालिकेत घालणार स्वतःचे दागिने
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 13:33 IST
एक माँ जो लाखों के लिये बनी अम्मा या मालिकेद्वारे उर्वशी शर्माने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. या मालिकेत ...
उर्वशी मालिकेत घालणार स्वतःचे दागिने
एक माँ जो लाखों के लिये बनी अम्मा या मालिकेद्वारे उर्वशी शर्माने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. या मालिकेत उर्वशी नेहमीच प्रेक्षकांना सोन्याचे दागिने घातलेली पाहायला मिळते. पण या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी खोटे दागिने घातल्यामुळे उर्वशीच्या अंगावर चट्टे उठत होते. तिला खोट्या दागिन्यांची अॅलर्जी असल्याने तिला खूपच त्रास होत होता. त्यामुळे तिने या मालिकेच्या क्रिएटिव्ह टिमशी चर्चा करून स्वतःच्या पैशाने अम्मा या भूमिकेसाठी लागणारे सगळे दागिने बनवून घेतले. तिने या व्यक्तिरेखेसाठी 14 बांगड्या, पाच अंगठ्या, चार वेगवेगळ्या प्रकारचे कानातले आणि विविध प्रकारचे हार बनवले आहेत. यापुढे चित्रीकरणासाठी ती तिचे हे दागिने वापरणार आहे. मला खोट्या दागिन्यांची अॅलर्जी असल्याने माझ्या अंगावर पुरळ उठत होते. या सगळ्याचा मालिकेच्या चित्रीकरणावर परिणाम होऊ नये यासाठी मी माझ्या पैशाने सोन्याचे दागिने बनवण्याचे ठरवले असे ती सांगते.