Join us

'चंद्रकांता' मालिकेसाठी उर्वशी ढोलकिया घेते घोडेस्वारीचे प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2017 17:55 IST

एकता कपूरचा बहुचर्चित  'चंद्रकाता' ही मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत उर्वशी ढोलकिया विशेष भूमिकेत झळकणार आहे. ...

एकता कपूरचा बहुचर्चित  'चंद्रकाता' ही मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत उर्वशी ढोलकिया विशेष भूमिकेत झळकणार आहे. यासाठी ती सध्या खूप मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.'चंद्रकाता'  मालिका म्हटले तर युध्द, घोडेस्वारी, तलवारबाजी करणे हे ओघाने आलेच. या सागळ्या गोष्टी नीट हाताळता याव्यात यासाठी सध्या उर्वशी तयारीला लागली आहे.मालिकेतील भूमिकेसाठी घोडेस्वारीचे खास प्रशिक्षण घेत आहे. या मालिकेत मालिकेत ती नेगेटीव्ह शेड असलेली भूमिका रंगवणार असल्याचे बोलले जात आहे. उर्वशी मालिकेत रानी इरावती नावाची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळतेय.या मालिकेत सगळे काही भव्य दिव्य असेच असणार आहे. त्यामुळे भूमिका साकारताना कुठेही कमी पडू नये म्हणून वेगेवगळ्या गोष्टी शिकण्याल लक्ष केंदित करत असल्याचे तिने उर्वशीने सांगितले आहे. तिला खास घोडेस्वारी प्रशिक्षणे घेणे किती आ्व्हानात्मक असल्याचे विचारण्यात आल्यावर तिने सांगितले की, खरं तर मालिकेसाठी मी घोडेस्वारी शिकत आहे. याचनिमित्ताने नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते.माझ्यासाठी घोडेस्वारी करणे हा एक रोमांचकारी अनुभव आहे.आधी मला थोडी भीती वाटत होती कारण घोडेस्वारी कधी केली नव्हती.मात्र आता प्रशिक्षण घेत असल्यामुळे मनातली सगळी भीती पळाली आहे. घोडेस्वारी करणे  मी खूप एन्जॉय करतेय.तसेच  सध्या चंद्रकांता नावाने आणखी एक शो सुरू झाला आहे. त्यात कृतिका कामरा चंद्रकांताची भूमिका साकारत आहे. त्यामुळे याविषयी उर्वशीला विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, एकाच नावाने दोन शो असले तरीही दोन्ही शोचा बाज वेगळा आहे. त्यामुळे जेव्हा एकता कपूरची चंद्रकांता मालिका रसिक पाहतील त्यांना नक्कीच आवडेल यांत काही दुमत नाहीय.उर्वशीने 'बिग बॉस 6 वे' सिझनचे विजेतेपद मिळवल्यानंतर 'बडी दू से आये है' या मालिकेत झळकली होती.तसेच उर्वशीने आधी एकता कपूरच्या बालाजी प्रोडक्शनच्याच 'कसौटी जिंदगी की 'या मालिकेत कोमोलिका ही नेगेटीव्ह भूमिका रंगवली होती. याच भूमिकेने उर्वशीला अमाप लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यामुळे आगामी मालिकेत उर्वशीची भूमिका छोट्या पडद्यावर कितपत ठस उमटवण्यात यशस्वी ठरते हे पाहणे रंजक ठरणार आहे.