Join us
Daily Top 2Weekly Top 5

उर्वशी ढोलकीयाचा लेक सागर करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 14:45 IST

टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकीया तिच्या आगामी 'चंद्रकांता' मालिकेच्या निमित्ताने खूप चर्चेत आहे. त्यामुळे ती सध्या सोशल मीडियावरही खूप अॅक्टीव्ह ...

टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकीया तिच्या आगामी 'चंद्रकांता' मालिकेच्या निमित्ताने खूप चर्चेत आहे. त्यामुळे ती सध्या सोशल मीडियावरही खूप अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतंय.रसिकही आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यात काय सुरू आहे या गोष्टी माहिती करून घेण्यासाठी उत्सुक असतात.त्यामुळे उर्वशीचे फॅन्स तिच्या सोशल मीडिया पेजलाही कनेक्ट असल्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीचे कौतुक करताना दिसतात.उर्वशीचा एक स्विट फोटोवर कौतुकाचा वर्षाव होतोय.यात ती तिच्या मुलांसह हॅप्पी मुडमध्ये दिसतेय. या फोटोत उर्वशीचा अंदाजही मोहुन टाकणारा आहे.काही दिवसांपूर्वीच उर्वशी घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेत असल्याचे सोशल मीडियावर शेअर होताच तिच्या कामाला घेवून किती एकनिष्ठ असते हे अधोरेखित झाले होते. तिच्या मेहनतीमुळेच आज ती यशस्वी टीव्ही अभिनेत्रींमध्ये गणली जाते.रिअल लाईफमध्येही उर्वशी तितकीच धाडसी आहे.नुकताच उर्वशीच्या मुलांनी तिचा एक स्विट सेल्फी सोशल मीडियावर अपलोड केला आहे. मुलांसह काढलेल्या या फोटोला चांगल्या प्रतिक्रीया मिळत आहेत. सागर आणि क्षितीज अशी त्यांची नाव आहेत. तर दुसरीकडे या प्रतिक्रीयांमध्ये उर्वशी प्रमाणे सागर आणि क्षितीज सिनेमात किंवा मालिकांमध्ये झळकणार का? असे प्रश्न विचारताना दिसतायेत. रसिकांच्या या सगळ्या प्रश्नांना उर्वशीने मौनच राहणे पसंत केले असले तरी मुळात सागरने 'हमशकल' सिनेमासाठी दिग्दर्शक साजिद खानलाही असिस्ट केले होते.तसेच तो लवकरच बॉलिवूड सिनेमात झळकणार असल्याच्या चर्चाही सुरू आहेत कारण, सागरने त्याच्या सोशल मीडियावर ''सी यु इन बॉलिवूड'' असे म्हटले आहे. त्यामुळे उर्वशीचा मुलगा आगामी काळात रूपेरी पडद्यावर झळकल्यास आश्चर्य वाटायला नको.उर्वशी ढोलकीया भूमिका साकारत असलेली 'चंद्रकाता' ही मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत उर्वशी ढोलकिया विशेष भूमिकेत झळकणार आहे. यासाठी ती सध्या खूप मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.'चंद्रकाता' मालिका म्हटले तर युध्द, घोडेस्वारी, तलवारबाजी करणे हे ओघाने आलेच. या सागळ्या गोष्टी नीट हाताळता याव्यात यासाठी सध्या उर्वशी तयारीला लागली आहे.