Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘एवढं काय हिचं प्रेगन्सीचं कौतुक’? ट्रोल करणाऱ्यांना मराठी अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 12:27 IST

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर सध्या तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे.मात्र सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल केले गेले. याच गोष्टीची खंत उर्मिलाने सोशल मीडियावर मांडली आहे. विशेष म्हणजे ट्रोल करणा-या महिलांनाही तिने प्रत्युत्तर दिले आहे.

मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर सध्या तिची प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. तिच्या प्रत्येक खास क्षणांची माहिती ती चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर करत असते. उर्मिला ही एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक युटुबरसुद्धा आहे. सोशल मीडियावर प्रचंड मोठी तिची फॅनफोलोईंग आहे. ती सोशल मीडीयावर प्रचंड सक्रिय असते. उर्मिलाला भटकंती करण्याची आवड आहे. विविध स्थळांना भेट देत तिथल्या खास गोष्टींचे व्हिडीओ ती चाहत्यांसह शेअर करत असते. प्रेग्नंसीमध्येही तिने विश्रांती न घेता तिची आवड जपल्याचे पाहायला मिळाले. 

प्रेग्नंसी जाहीर केल्यापासून उर्मिलाने प्रेग्नंसी कशाप्रकारे एन्जॉय करत आहे या सगळ्या अपडटे चाहत्यांसह शेअर केल्या. तिचे बेबी बंम्प असलेले फोटोही तिने मध्यंतरी शेअर केले होते. उर्मिलाच्या चाहत्यांनीही तिला शुभेच्छा देत लाईक्स आणि कमेंट्स केल्या होत्या. मात्र सोशल मीडियावर उर्मिला निंबाळकरच्या काही महिला युजर्सना मात्र तिचे असे वागणं फारसे पटले नाही. त्यामुळे उर्मिलाला तिच्या प्रेग्नंसीमुळेच ट्रोल केले जात आहे. 

याच गोष्टीची खंत उर्मिलाने सोशल मीडियावर मांडली आहे. विशेष म्हणजे ट्रोल करणा-या महिलांनाही तिने प्रत्युत्तर दिले आहे. ''आमचं बाळ काय ढगातून पडलंय का?’‘एवढं काय हिचं प्रेगन्सीचं कौतुक’?‘कोणाला काय पोटं येत नाहीत का?’मागच्या ९ महिन्यात या सगळ्या कमेंट्स,मला स्त्रीयांनीच पाठवल्यात ☺️स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या आनंदात आणि वेदनेच्या अतिशय सारख्याच प्रवासातही आपण तिला साथ देऊ शकत नाही,ही स्त्री जातीची शोकांतिका आहे.पण एक स्त्री म्हणून मी इतर स्त्रीयांना सांगेन,जेवढे हे क्षण टिपतां येत असतील, तेवढे टिपून घ्या,या संपुर्ण प्रवासाचा खुप आनंद लूटा.हे सुंदर, जादुई क्षण अतिशय पटकन संपून जातात आणि पुन्हा कधीच परत येत नाहीत. (त्यासाठी डायरेक्ट दुसरं बाळ जन्माला घालावं लागतं)मला तर विश्वासच बसत नाहीय की, माझा ९ वा महिना सुद्धा संपायला आता काही दिवसंच राहिलेत.आनंद, उत्साह आणि फक्त या दिव्य व्यवस्थेचे निरीक्षण करतमी कृतज्ञता व्यक्त करत आहे ''🙏🏼

उर्मिलाच्या या पोस्टवर अनेक सकारात्मक कमेंट्सही उमटल्या आहेत. एका महिला युजरने म्हटले आहे की,''आज पर्यंत आम्हाला भीती वाटायची ऐकून .... पण तुझा अनुभव ऐकून किती मुली प्रेग्नंसी सकारात्मक दृष्टीने एन्जॉय करतील,.... तुझं बाळ या जगात निरोगी आणि सुदृढ असेल 💓..... I love you खूप सारं''

 

उर्मिलाने निंबाळकरने मराठीसह हिंदीतही काम केले आहे. 'दिया और बाती हम' , 'मेरी आशिकी तुमसेही' या हिंदी मालिकेत ती झळकली आहे. या शिवाय मराठी मालिका 'दुहेरी' विशेष गाजली होती. मालिकेतल्या उर्मिलाच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.