Join us
Daily Top 2Weekly Top 5

उर्फी जावेदचा अध्यात्माकडे कल, ४०० पायऱ्या चढली अन् शिव मंदिरात घेतलं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:25 IST

उर्फी जावेदचा अध्यात्माकडे कल दिसून आला आहे.

Urfi Javed: टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्री तिच्या नवीन फॅशन लूकमुळे चर्चेत असते. अशातच अभिनेत्रीचा एक फोटो समोर आला आहे. जो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

उर्फी जावेदचा अध्यात्माकडे कल दिसून आला आहे. उर्फी ४०० पायऱ्या चढून शिवमंदिरात पोहोचली. समोर आलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री शिवाच्या भक्तीत मग्न असल्याचे दिसून येत आहे.  यावेळी उर्फी भारतीय लूकमध्ये खूपच साधी आणि गोंडस दिसतेय. तिने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला. फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "या शिवमंदिरात पोहोचण्यासाठी मी ४०० पायऱ्या चढली आहे".

सोशल मीडियावर उर्फी चर्चेत आली आहे. तिची शिवभक्ती पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे काही लोकांनी तिला ट्रोल केलं आहे. अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिला २०२१ मध्ये 'बिग बॉस ओटीटी सीझन १' मधून लोकप्रियता मिळाली. यानंतर ती अनेक टीव्ही मालिकांमध्येही दिसली. २०२४ मध्ये ती 'एलएसडी २' चित्रपटात दिसली. तसेच तिची 'फॉलो कर लो यार' ही सीरिजदेखील प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. 

टॅग्स :उर्फी जावेदसेलिब्रिटी