Join us

Uorfi Javed :अतरंगी फॅशन आली अंगाशी, उर्फी जावेदविरोधात तक्रार दाखल; अश्लीलता पसरवल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 13:12 IST

सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

उर्फी जावेदची (Urfi Javed) नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. रोज उर्फीच्या नावाची चर्चा होतेच. ‘बिग बॉस ओटीटी’मधून ती प्रकाशझोतात आली. शोमधून बाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक ठरली. पण शोमधून बाहेर आल्यानंतरच ती सर्वाधिक चर्चेत राहिली. कमालीच्या बोल्ड फॅशन सेन्समुळेच तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. उर्फी केवळ एकाच कारणानं चर्चेत असते, ते म्हणजे तिची ड्रेसिंग स्टाईल. अशात उर्फी सध्या अडचणीत आली आहे. पोलिसांनी तिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.  सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वकील असलेल्या अली काशीफ खान देशमुख यांनी अंधेरी पोलिस ठाण्यात अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत लेखी तक्रार दाखल केली आहे. आपल्या अतरंगी कपड्यांमुळे उर्फी अडचणीत सापडली आहे. उर्फी जावेदचे कपड्यांवर नेहमीच प्रश्न उपस्थित केला जातो. हिंदुस्थानी भाऊने व्हिडीओ बनवून तिला धमकीही दिली होती, त्यानंतर अभिनेत्रीने त्याला प्रत्युत्तर दिलं होतं.

याआधी उर्फी विरोधात तक्रार झाली होती दाखलयापूर्वी एका व्यक्तीने उर्फी जावेदच्या विरोधात दिल्लीच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यातही अभिनेत्रीवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता. एवढेच नाही तर 'हे है ये मजबूरी' या म्युझिक व्हिडिओमुळे ती कायदेशीर अडचणीतही सापडली होती. गाण्यात त्याने रिलीव्हिंग आउटफिट घातल्याचा आरोप करण्यात आला होता.

उर्फीने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. तसेच ती big boss बिग बॉस मध्येही होती. तिथुन तिला प्रसिद्धी मिळाली. बिग बॉस मध्ये ती केवळ एक आठवडा राहू शकली मात्र तिथेही तिच्या फॅशन सेन्स ने सर्वांना हैराण केले होते. सध्या उर्फी splitsvilla 14 'स्प्लिट्सव्हिला १४' शो मध्ये दिसून येत आहे ज्यामुळे हा शो सुद्धा चर्चेत आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारगुन्हेगारी