Join us

निशब्द छोट्या पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 13:36 IST

वयाने मोठा असलेला अभिनेता आणि छोटी अभिनेत्री यांची प्रेमकथा आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिली आहे. आता प्रेक्षकांना अशाच प्रकारची कथा ...

वयाने मोठा असलेला अभिनेता आणि छोटी अभिनेत्री यांची प्रेमकथा आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिली आहे. आता प्रेक्षकांना अशाच प्रकारची कथा एका मालिकेत पाहायला मिळणार आहे. बंधे एक डोरी से ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सबा मुमताज या मालिकेची निर्मिती करणार आहेत तर या मालिकेत प्रेक्षकांचा लाडका एजाज खान प्रमुख भूमिका साकारणार आहे. डीफोर या कार्यक्रमामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री नियती फतनानी या मालिकेत एजाजसोबत झळकणार असल्याची चर्चा आहे.