Join us
Daily Top 2Weekly Top 5

परीच्या वाढदिवसाला नेहा आईने दिले अनोखे सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 19:10 IST

‘नकळत सारे घडले’ या मालिकेत एक खास सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे. हे  सेलिब्रेशन आहे ते लाडक्या परीच्या वाढदिवसाचे. परीला सरप्राईज देण्यासाठी नेहाने परीचा वेष धारण करत सर्वांनाच गोड धक्का दिला.

ठळक मुद्दे ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत खास सेलिब्रेशन नेहा आईने दिले परीला सरप्राईज

स्टार प्रवाहवरील ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत एक खास सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे. हे  सेलिब्रेशन आहे ते लाडक्या परीच्या वाढदिवसाचे. परीला सरप्राईज देण्यासाठी नेहाने परीचा वेष धारण करत सर्वांनाच गोड धक्का दिला. गोष्टींमध्ये वाचलेली परी प्रत्यक्षात अवतरली हे पाहून परीही आनंदात होती. धमाल-मस्ती आणि गाणी गात सर्वांनीच परीचा वाढदिवस साजरा केला.

परीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप दिवसांनंतर रांगडे पाटील कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. परी आणि नेहामधला कडवटपणाही दूर झाला. त्यामुळे हे सोनेरी क्षण प्रत्येकानेच मनात जपून ठेवले आहेत. मनोरंजनाने परिपूर्ण असा हा एपिसोड असणार आहे.  त्यासाठी ‘नकळत सारे घडले’ सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर  पाहायला विसरु नका.नकळत सारे घडले या मालिकेची मूळ संकल्पना स्टार प्रवाह क्रिएटिव्ह टीमची आहे तर अभिनेता स्वप्निल जोशीच्या जिसिम्स संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे. बदलत्या काळातल्या बदलत्या नातेसंबंधाची गोष्ट या मालिकेत उलगडली जात आहे. हरीश दुधाडे, नुपूर परुळेकर, अनुराधा राजाध्यक्ष, सुदेश म्हशीलकर, सुरेखा कुडची अशा उत्तम स्टारकास्टची निवड स्टार प्रवाहने या मालिकेसाठी केली आहे. त्यामुळे ही मालिका अल्पावधीचत प्रेक्षकांचे मन जिंकत आहे.  

टॅग्स :स्टार प्रवाह