Join us

में हूँ आदत से मजबूर...! घरात सूनबाई आली तरी उदित नारायण यांची ‘ती’ सवय सुटेना...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 13:31 IST

‘द कपिल शर्मा शो’मध्ये अशी झाली पोलखोल

ठळक मुद्देगेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आदित्य नारायणने गर्लफ्रेन्ड मैत्रीण श्वेता अग्रवालसोबत मुंबईतील एका मंदिरात साध्या सोहळ्यात लग्न केले. आदित्य व श्वेता दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते.   

द कपिल शर्मा शो’च्या (The Kapil Sharma Show) काल रविवारी रंगलेल्या एपिसोडमध्ये बॉलिवूडचे दिग्गज गायक उदित नारायण, कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल हे त्रिकुट दिसलं. तीन एकापेक्षा एक दिग्गज गायक एकत्र आल्यानंतर शो रंगणारच. अपेक्षेप्रमाणे या एपिसोडमध्ये धम्माल मज्जा आली. नुसती धम्माल नाही तर कपिल शर्माने उदित नारायण यांची चांगलीच पोलखोल केली. होय, या एपिसोडमध्ये कपिल शर्मा उदित नारायण (Udit Narayan)यांची चांगलीच फिरकी घेताना दिसला.एक जुना किस्सा आठवत कपिल शर्मा उदित नारायण यांची मस्करी केली. याआधी उदित नारायण मुलगा आदित्य नारायणसोबत कपिलच्या शोमध्ये आले होते. तेव्हा, उदित हे घरात फक्त टॉवेल बांधून फिरतात, असा खुलासा झाला होता. कपिलने नेमक्या याच गोष्टीवरून उदित नारायण यांची फिरकी घेतली.  ‘आता सूनबाई घरी आली आहे, त्यामुळे तुम्हाला आता या सवयीचा खूप त्रास होत असेल,’ असे कपिल उदित यांना म्हणाला. यावर उदित नारायण यांनीमजेदार उत्तर दिलं.

‘मी अजूनही टॉवेलमध्येच घरात वावरतो. मी एका शेतकºयाचा मुलगा आहे. त्यामुळे ही सवय सुटेल, असं मला वाटत नाही,’ असे उदित नारायण म्हणाले. त्यांचे हे उत्तर ऐकून कुमार सानू व अनुराधा पौडवाल या दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला नसेल तर नवल. मग काय? या थट्टामस्करीत कुमार सानूही सहभागी झालेत.  ‘हो, हा शेतक-याचा मुलगा आहे. याने कधीच शेत पाहिलं नसेल, पण टॉवेल पाहिला आहे,’ असे कुमार सानू म्हणाले. त्यांच्या या वाक्यानंतर हास्याचे कारंजे फुटले, हे सांगणे नकोच.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आदित्य नारायणने गर्लफ्रेन्ड मैत्रीण श्वेता अग्रवालसोबत मुंबईतील एका मंदिरात साध्या सोहळ्यात लग्न केले. आदित्य व श्वेता दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते.   

टॅग्स :उदित नारायणद कपिल शर्मा शो