Join us

ढाई किलो प्रेम फेम मेहेरझान माझ्दाच्या आईला आलेय टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 15:59 IST

मेहेरझान ढाई किलो प्रेम या मालिकेत पियूष ही भूमिका साकारत आहे. या मालिकेसाठी त्याने जवळजवळ 20 किलो वजन वाढवले ...

मेहेरझान ढाई किलो प्रेम या मालिकेत पियूष ही भूमिका साकारत आहे. या मालिकेसाठी त्याने जवळजवळ 20 किलो वजन वाढवले आहे. मेहेरझानचे हे वाढलेले वजन पाहाता आता त्याचे लग्न कसे होणार असा प्रश्न त्याच्या आईला पडलेला आहे. कारण त्याच्या आईने गेल्या काही दिवसांत त्याच्यासाठी खूप चांगली स्थळे आणली होती आणि त्याचे वाढलेले आकारमान पाहाता या स्थळांनी त्याला नकार दिलेला आहे. यामुळे माझ्या मुलाशी आता कोणी लग्न करणार की नाही असे त्याच्या आईला वाटायला लागले आहे. याविषयी मेहेरझानची आई सांगते, "मेहेरझान हा पूर्वी गोरगरगरीत होता. पण त्याने त्याच्या शरीरावर प्रचंड मेहनत घेतली आणि त्याचे वजन कमी केले. पण आता तो पूर्वीसारखाच अतिशय जाडा झालेला आहे. त्याचे हे आकारमान पाहून मलाच टेन्शन यायला लागले आहे. त्याचे वय हे आता लग्न असून जीवनात स्थिर व्हायचे आहे. पण त्याच्या व्यवसायिक आयुष्याचा त्याच्या वैयक्तिक जीवनावर विपरत परिणाम झाला असून त्याला त्याचे कोणतेच जीवन यशस्वीपणे जगता येत नाहीये असे मला वाटते. त्यामुळे मला त्याची चिंता सतावायला लागली आहे." याविषयी मेहेरझान सांगतो, "मी पूर्वी खूप जाडा होता. पण मी प्रचंड मेहनत घेऊन सिक्स पॅक्स अॅब्स कमावले होते. त्यामुळे पुन्हा जाडे व्हायचे हा निर्णय घेणे माझ्यासाठी खरे तर खूपच त्रासदायक होता. पण ही भूमिका मला आवडल्याने मी स्वीकारली आणि त्यानंतर कोणत्याच गोष्टींचा विचार केला नाही. मी सध्या माझ्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचाच प्रयत्न करत आहे."