Join us
Daily Top 2Weekly Top 5

कहानी में ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 12:30 IST

एक दुजे के वास्ते या मालिकेत प्रेक्षकांना एक नवी एंट्री पाहायला मिळणार आहे. या मालिकेत एका अभिनेत्याची एंट्री होणार ...

एक दुजे के वास्ते या मालिकेत प्रेक्षकांना एक नवी एंट्री पाहायला मिळणार आहे. या मालिकेत एका अभिनेत्याची एंट्री होणार असल्याची चर्चा आहे. त्याच्या एंट्रीनंतर श्रवणची भूमिका साकारणारा नमिक पॉलला डिच्चू मिळणार आहे का असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण नमिकला डिच्चू मिळणार नसून कथेला एक वेगळे वळण देण्यासाठी एक नवीन व्यक्तिरेखा मालिकेत दाखल होणार आहे. लग्नाच्या संगीत समारंभाच्या दरम्यान तू कोन मैं कोन या मालिकेत झळकलेला रोनित कपिलचा मालिकेत प्रवेश होणार आहे. रोनित आदित्य ही व्यक्तिरेखा साकारणार असून प्रेक्षकांना श्रवण-सुमन-आदित्य हा नवा लव्ह ट्रँगल पाहायला मिळणार आहे.