Join us

कार्तिकचं आपले वडील असल्याचं सत्य कार्तिकीसमोर येणार; मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 18:16 IST

Rang maza wegla: कार्तिकच आपले वडील असल्याचं कार्तिकीला समजल्यानंतर तिची प्रतिक्रिया काय असेल किंवा कार्तिकीप्रमाणेच दीपिकालादेखील दिपाच आपली आई आहे हे सत्य समजेल का?

गेल्या कित्येक दिवसांपासून रंग माझा वेगळा या मालिकेत कार्तिक आणि दीपा यांच्या आयुष्यात चढउतार येत असल्याचं पाहायला मिळत आहे. कार्तिकी आणि दीपिका यांच्यासमोर त्यांचे आई-बाबा असूनही त्या मुलींना सत्य माहित नाही. त्यामुळे हे सत्य मुलींना कधी कळणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दाटली आहे. यामध्येच आता कार्तिकीला तिच्या वडिलांचं सत्य कळणार आहे. आपले बाबा कोण हे तिला समजणार आहे.

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये कार्तिकच आपले खरे वडील असल्याचं कार्तिकीला समजणार आहे. त्यामुळे आता या मालिकेत पुन्हा एक नवं रंजकदार वळण येणार आहे. 

दरम्यान, कार्तिकच आपले वडील असल्याचं कार्तिकीला समजल्यानंतर तिची प्रतिक्रिया काय असेल किंवा कार्तिकीप्रमाणेच दीपिकालादेखील दिपाच आपली आई आहे हे सत्य समजेल का? या चौघांचं कुटुंब पुन्हा एकत्र येईल का असे असंख्य प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत. परंतु, त्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या पुढील भागातच मिळणार आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकाररेश्मा शिंदे