Join us
Daily Top 2Weekly Top 5

रमासमोर येणार पद्मिनीचा खरा चेहरा; फुगड्यांच्या स्पर्धेत फुटणार पद्मिनीचं बिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 16:45 IST

Rama raghav: रमाची पहिलीच वटपौर्णिमा असल्यामुळे पुरोहितांच्या घरी पारंपरिक फुगड्यांची स्पर्धा रंगणार आहे. रमा ही स्पर्धा जिंकणार की पुरोहितांची थोरली सून म्हणून घरात दाखल झालेली पद्मिनी हा मान मिळवणार?

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे रमा राघव. ही मालिका सुरु झाल्यापासून लोकप्रियतेमध्ये प्रथम स्थानावर आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये वरचेवर या मालिकेची चर्चा रंगत असते. सध्या या मालिकेत वटपौर्णिमा विशेष भाग सुरु आहे. लग्नानंतर रमाची पहिली वटपौर्णिमा आहे. त्यामुळे पुरोहितांच्या घरी पारंपरिक पद्धतीने ती साजरी केली जात आहे.

रमाची पहिलीच वटपौर्णिमा असल्यामुळे पुरोहितांच्या घरी पारंपरिक फुगड्यांची स्पर्धा रंगणार आहे. रमा ही स्पर्धा जिंकणार की पुरोहितांची थोरली सून म्हणून घरात दाखल झालेली पद्मिनी हा मान मिळवणार हे या मालिकेत लवकरच पाहायला मिळणार आहे.

पद्मिनी रमाच्या चांगुलपणाचा फायदा घेत असून तिला रमाची सहानभुती मिळवण्यात यश आलं आहे. परंतु, या फुगड्यांच्या निमित्ताने पद्मिनीचं खरं खूप रमासमोर येणार का? हे सुद्धा २४ जुनला होणाऱ्या या विशेष भागात पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी