Join us

सिम्मी नव्हे चक्क परीच्या तालावर नाचतोय विश्वजीत; या दोघांचा 'चंद्रा'वरील भन्नाट डान्स एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 16:16 IST

Pari and vishwajit: अनेकदा या मालिकेच्या सेटवरील परीसोबतचे काही फोटो, व्हिडीओ हे कलाकार शेअर करत असतात.

अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरलेली मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ' (mazi tuzi reshimgath). या मालिकेतील नेहा आणि यश या जोडीला प्रेक्षकांनी जितकं प्रेम दिलं. त्याच्या कैकपटीने प्रेक्षकांनी परीला उचलून धरलं.  या मालिकेतील अत्यंत कमी वयाची असलेल्या परीने अवघ्या काही भागांमध्येच प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. विशेष म्हणजे केवळ प्रेक्षकच नाही तर या मालिकेतील कलाकारही तिचे चाहते झाले आहेत. त्यामुळे अनेकदा या मालिकेच्या सेटवरील परीसोबतचे काही फोटो, व्हिडीओ हे कलाकार शेअर करत असतात. यामध्येच सध्या परी आणि विश्वजीतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

बालकलाकार असण्यासोबतच परी एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्युएन्सरदेखील आहे. इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर तिचे असंख्य फॉलोअर्स आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तिची आई वा वडील परीचे म्हणजेच मायरा वायकुळचे काही फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. यावेळी त्यांनी सेटवरील परी व सत्यजीतचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात परी, सत्यजीतला चंद्रा गाण्यावर डान्स शिकवत आहे.

दरम्यान, परी आणि विश्वजीतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. या दोघांची ऑफस्क्रीन असलेली मैत्री साऱ्यांनाच आवडत आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही मालिकेतील अनेक कलाकारांनी परीसोबतचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारश्रेयस तळपदे