Join us
Daily Top 2Weekly Top 5

​बलात्कारप्रकरणी टिव्ही कलाकार पीयूश सहदेवला अटक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 10:25 IST

टिव्ही कलाकार पीयूश सहदेवला मुंबई पोलिसांनी बलात्कारप्रकरणी अटक केली आहे. वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेच्या आरोपावरुन २२ नोव्हेंबरला पीयूशच्या ...

टिव्ही कलाकार पीयूश सहदेवला मुंबई पोलिसांनी बलात्कारप्रकरणी अटक केली आहे. वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेच्या आरोपावरुन २२ नोव्हेंबरला पीयूशच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पीयूशला कोर्टात नेण्यात आले होते. त्याला २७ नोव्हेंबरपर्यंत ताब्यात घेण्यात आले असून पोलीस कोठळी देण्यात आली आहे. वर्साेवा पोलीस स्टेशन अधिक्षक किरण यशवंतराव यांनी सांगितले की, २० नोव्हेंबरला एका मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरु केला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.  पीयूश हा गेल्या सहा महिन्यापासून त्याच्या पत्नीसोबत राहत नव्हता. याबाबत मीडियाने त्याच्या पत्नीस मॅसेजद्वारा विचारणा केली असता तिने असे सांगितले की, ‘गेल्या सहा महिन्यापासून मी त्याच्यापासून विभक्त झाली असून या प्रकरणाबाबत मला काहीच माहित नाही.’ पत्नी आकांशा रावत हिच्या घटस्पोटावरुनही पीयूश खूपच चर्चेत राहिला आहे. असे म्हटले जाते की, पीयूशचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर होते. मिळालेल्या माहितीनूसार, पीयूशचे ‘बेहद’ सीरियलची क्रीएटिव्ह टीमच्या एका सदस्यासोबत अफेअर सुरु होते. विशेष म्हणजे स्वत: पीयूशने याबाबत खुलासा केला होता आणि घटस्पोटासाठी मी अर्ज केला आहे, असेही त्याने जाहीर केले होते.   काही महिन्यांपूर्वी पीयूशचे फेसबुक अकाउंट हॅक झाले होते, आणि त्याने याबाबत माहितीही दिली होती, तेव्हाही पीयूश चर्चेत आला होता. त्यावेळी हॅकरने त्याच्या अकाउंटवरून त्याच्या मित्रांना शिवीगाळ केलेले मॅसेज केले होते. पीयूशने आतापर्यंत ‘देवों के देव महादेव’, ‘मीत मिला दे रब्बा’ आणि ‘बेहद’ यासारखे शोजमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे त्याचे फॅन्सदेखील मोठ्याप्रमाणात आहेत.