Join us
Daily Top 2Weekly Top 5

"कॉम्प्रोमाइज नको फक्त...", कामाच्या बहाण्याने टीव्ही अभिनेत्रीकडे निर्मात्याची अजब डिमांड, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 13:52 IST

कामाच्या बहाण्याने कॅफेत भेटण्याची मागणी केली अन्...; २५ वर्षीय अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव

Television Actress Priya Thakur: छोट्या पडद्यावरील  वसूधा या हिंदी मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेलं नाव म्हणजे अभिनेत्री प्रिया ठाकूर. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतून प्रिया ठाकूर घराघरात ओळख मिळाली. मात्र,तिचा हा प्रवास फार काही सोपा नव्हता. इंडस्ट्रीत स्वतचं हक्काचं स्थान निर्माण करण्यासाठी अभिनेत्रीला अनेक चांगल्या-वाईट अनुवांना सामोरं जावं लागलं.

प्रिया ठाकूरने नुकत्याच एका मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने अभिनय प्रवासात तिला आलेले कटू अनुभव सांगितले आहेत.

दरम्यान, गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने कास्टिंग काऊचबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.प्रियाने सांगितलं की, तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात ती कास्टिंग काउचचा अनुभव आला होता. मात्र, स्वत च्या हुशारीने तिने या सगळ्या प्रकरणाशी डील केलं. मुलाखतीत प्रिया म्हणाली,"मला एका प्रोजेक्टची ऑफर मिळाली होती, ज्याचं शूटिंग आफ्रिका आणि अमेरिकामध्ये होणार होतं.पण या ऑडिशनसाठी मला ऑफिसऐवजी एका कॅफेमध्ये भेटायला सांगितलं. यामुळे मी अस्वस्थ झाले आणि त्यांना थेट विचारलं, "एवढ्या मोठ्या चित्रपटाच्या निर्मात्यांना ऑफिस नसते का?" त्यावर उत्तर आले, "सरांना ऑफिसच्या बाहेर भेटायचे आहे." शिवाय, एका कॉलदरम्यान तिला सांगण्यात आले की, चित्रपटात काम करण्यासाठी कोणतीही मोठी तडजोड करण्याची गरज नाही, फक्त चित्रपट बनवणाऱ्या सरांची गळाभेट करा. हे ऐकून प्रियाला धक्काच बसला.

अभिनेत्रीनं चांगलंच सुनावलं...

"तुम्हाला माझ्याबद्दल असं काय जाणून घ्यायचं आहे जे मी तुम्ही ऑफिसमध्ये बोलू शकत नाही, पण कॅफेमध्ये सांगायला तयार झालात?" अभिनेत्रीचं हे वक्तव्य ऐकून त्यांनी दुसऱ्या अभिनेत्रीला या प्रोजेक्टमध्ये कास्ट करणार, असं सांगितलं.

English
हिंदी सारांश
Web Title : TV actress rejects producer's 'compromise' demand for film role.

Web Summary : Actress Priya Thakur revealed a casting couch experience where a producer requested a 'hug' instead of an audition for a film role. She refused, questioning the need for such a meeting outside an office setting, leading to her replacement.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी