Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आजकालच्या स्वाईप कल्चरची भीतीच...", घटस्फोटानंतर टीव्ही अभिनेत्री प्रेमाला देणार दुसरी संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:51 IST

टीव्ही अभिनेत्यासोबत घटस्फोट झाला, नैराश्यात गेली; आता अभिनेत्री वैयक्तिक आयुष्याविषयी म्हणते...

'प्यार की ये एक कहानी' फेम अभिनेता विवियन डिसेनाची पहिली पत्नी वाहबीज दोराबजी. सध्या वाहबीज वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.  वाहबीज टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा आहे. आज ती ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. दरम्यान घटस्फोटानंतर प्रेमाला दुसरी संधी देण्यावर तिने नुकतीच प्रतितक्रिया दिली आहे. घटस्फोट, त्यानंतर आलेलं नैराश्य यामधून बाहेर पडत आता तिला पुन्हा आयुष्याला आणखी एक संधी द्यायची आहे.

आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत वाहबीज म्हणाली, "मी सध्या कोणालाही डेट करत नाहीये. मी स्वत:वर आणि कामावर लक्ष्य देत आहे. नात्यांबाबतीत मी खूप जुन्या विचारांची आहे. आजही मला ९० च्या दशकात जसं प्रेम असायचं तशा प्रेमावर विश्वास आहे. माझ्या जीवनाला अर्थ देईल, माझ्या बरोबरीचा असेल, महत्वाकांक्षी असेल आणि कुटुंबाला समर्पित असेल अशा मुलाच्या मी शोधात आहे. आजकालच्या स्वाईप कल्चरची मला भीतीच वाटते. जर आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देणार असेल तर ती नक्कीच घेतली पाहिजे तो तुमचा हक्क आहे."

वाहबिजने २०१३ साली विवियन डिसेनासोबत लग्नगाठ बांधली होती. दोघंही 'प्यार की ये एक कहानी' मालिकेत होते.  मात्र त्यांची मालिकेत जोडी नव्हती. तरी सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. लग्नानंतर ८ वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. विवियन डिसेना नुकताच 'बिग बॉस'मध्ये दिसला होता. विवियनने काही वर्षांपूर्वीच एका जर्निलिस्टसोबत दुसरं लग्न केलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Wahbbiz Dorabjee embraces love again after divorce, fears swipe culture.

Web Summary : Actress Wahbbiz Dorabjee, Vivian Dsena's ex-wife, is open to love again after divorce. Focusing on self-growth, she seeks a partner with traditional values, ambition, and family dedication. She fears modern dating's superficiality, believing in second chances for love.
टॅग्स :टिव्ही कलाकारघटस्फोट