Join us
Daily Top 2Weekly Top 5

लहानपणी अशी दिसायची टीव्ही अभिनेत्री सौम्या टंडन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2017 15:55 IST

'भाभीजी घर पर है' मालिकेतील अनिता भाभी म्हणजेच टीव्ही अभिनेत्री सौम्या टंडनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे तिला खूप ...

'भाभीजी घर पर है' मालिकेतील अनिता भाभी म्हणजेच टीव्ही अभिनेत्री सौम्या टंडनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे तिला खूप सा-या चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. शेअर केलेला हा फोटो सौम्या टंडनचा लहानपणीचा फोटो आहे. या फोटोत सौम्या लहानपणीही खूप गोड दिसायची, क्युट फोटोमुळे तिला तिचे आणखी खास फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी तिचे चाहते सांगतायेत. असे काही खास निमित्त नसून फोटो दिसला म्हणून शेअर केल्याचे सौम्याने म्हटले आहे. सौम्या आजही तितकीच सुंदर दिसते. त्यामुळे तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या सौदर्यांवरही चाहते फिदा होताना दिसतात.सौम्याविषयी एक खास गोष्ट रसिकांना माहिती नसावी, ती म्हणजे एक अभिनेत्रीसह एक उत्तम कवियत्रीही आहे.तिने अगदी कमी वयातच तिने लिखानाला सुरूवात केली होती. 'मेरी भावनाऐ' नावाचे एक पुस्तकही सौम्याने  लिहिले आहे.सौम्याला घरातूनच लिखानाचे बाळकडू मिळाले आहे.सौम्याचे वडिल जीबी टंडन विक्रम यूनिव्हर्सिटी उज्जैनमध्ये इंग्लिश डिपार्टमेंटचे एचओडी होते. ते शेक्सपियर लिटरेचरचे एक्सपर्ट होते. आतापर्यंत जीबी टंडन यांनी इंग्लिश लिटरेचरच्या विविध शाखांवर जवळपास 17 पुस्तक लिहिले आहेत.सध्या भाभीजी घर पर है या मालिकेतून घराघरांत पोहचलेली सौम्या टंडन ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र त्यांवर सौम्याने म्हटले होते की, या मालिकेच्या टीमसोबत काम करायला मला खूपच मजा येतेय. गोरीमेम या व्यक्तिरेखेवर तुम्ही नेहमीच प्रेम करत राहा.मी मालिकेचे शूटिंग करत असून माझे मालिका सोडण्याच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नयेत. त्या केवळ अफवा असल्याचे सौम्याने स्पष्ट केले होते.