Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी गरोदर आहे...", ३८व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार रुबिना दिलैक, व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 17:33 IST

रुबिनाने एक गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. रुबिना पुन्हा गरोदर आहे. ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. 

रुबिना दिलैक हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'छोटी बहू' या मालिकेतून रुबिना घराघरात पोहोचली. रुबिना दिलैकचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. रुबिनाने एक गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. रुबिना पुन्हा गरोदर आहे. ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. 

रुबिनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती म्हणते "मी गरोदर आहे. त्यानंतर रुबिनाने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. जर गोष्टी तुम्हाला हव्या तशा घडत नसतील तर त्या तुम्ही विचार केलाय त्यापेक्षाही खूप चांगल्या पद्धतीने घडतात. हीच खरी सुंदरता आहे", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

रुबिनाने २०१८ मध्ये अभिनव शुक्लासोबत लग्न करत संसाप थाटला. लग्नानंतर ५ वर्षांनी रुबिनाने तिच्या जुळ्या मुलींना जन्म दिला होता. आता पुन्हा ती आई होणार आहे. रुबिनाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'बिग बॉस'मध्येही ती दिसली होती. तर 'पती पत्नी और पंगा', 'लाफ्टर शेफ' या रिएलिटी शोमध्ये रुबिनाने सहभाग घेतला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rubina Dilaik Announces Second Pregnancy at 38, Shares Video

Web Summary : Rubina Dilaik, famed for 'Choti Bahu,' revealed her second pregnancy in an Instagram video. Married to Abhinav Shukla in 2018, she previously had twins. The actress, known for TV shows and 'Bigg Boss,' shared her joy with fans.
टॅग्स :टिव्ही कलाकारप्रेग्नंसी