Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केलं प्रेग्नंसी फोटोशूट, इंडोवेस्टर्न लुकमध्ये दिसतेय खूपच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 08:37 IST

देवीपेक्षा कमी नाही रुबिनाचा लुक

टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik) आई होणार आहे. नुकतंच तिने मॅटर्निटी फोटोशूट केलं जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. आजकाल वेगवेगळ्या थीम्समध्ये मॅटर्निटी फोटोशूट करण्याचा ट्रेंड आहे. रुबिनाचंही हे फोटोशूट खूपच युनिक आहे. यामध्ये तिने देवीचा अवतार केला आहे. पांढऱ्या आऊटफिटमध्ये तिने हे फोटोशूट केलंय.

रुबिनाच्या मॅटर्निटी फोटोशूटची थीम व्हाईट आहे. तिने आणि पती अभिनव शुक्ला दोघांनी पांढऱ्या शुभ्र रंगाचे कपडे परिधान केले आहेत. अनिभवने पांढरा टीशर्ट, त्यावर पांढरा कोट आणि पँट घातलेली दिसतेय ज्यात तो कमालीचा हँडसम दिसत आहे. तर रुबिनाने इंडोवेस्टर्न लुक केला आहे जो देवीच्या रुपाशी मिळताजुळता आहे. त्यावर तिने सोनेरी रंगाचे दागिने घातले आहेत. 'माझ्या आयु्ष्यातील चमत्कार ज्याचं मी शब्दात वर्णनही करु शकत नाही' असं तिने कॅप्शन दिलं आहे. 

रुबिना गरोदर असल्याच्या चर्चा काही महिन्यांपूर्वीच सुरु झाल्या होत्या. तर सप्टेंबर महिन्यात तिने बेबी बंप दाखवत चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली. जून २०१८ मध्ये रुबिना आणि अभिनव लग्नबंधनात अडकले. तर आता लग्नानंतर ५ वर्षांनी ते पहिल्या बाळाला जन्म देणार आहेत. चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय.

टॅग्स :टिव्ही कलाकारप्रेग्नंसीगर्भवती महिलाव्हायरल फोटोज्सोशल मीडिया