Join us

गोव्याच्या समुद्रकिनारी बॉयफ्रेंडने केलं प्रपोज, टीव्ही अभिनेत्री 'जम्मू'मध्ये लग्न करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 11:05 IST

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी केलं प्रपोज, लग्नाच्या तयारीला सुरुवात

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्री झील मेहता काही दिवासांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. सोनू भिडे या भूमिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली होती. आता आणखी एक टीव्ही अभिनेत्री लग्न करत आहे. २०२५ नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ती सातफेरे घेणार आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री जम्मू येथे विवाहबद्ध होणार आहे. १ जानेवारीलाच तिला तिच्या होणाऱ्याने नवऱ्याने प्रपोज केलं आणि आता ते लग्नबंधनात अडकणार आहेत. कोण आहे ही अभिनेत्री? 

'इमली', 'मिश्री' या हिंदी मालिकांमध्ये दिसलेली ही अभिनेत्री आहे मेघा चक्रवर्ती (Megha Chakraborty). मेघा लवकरच बॉयफ्रेंड साहिल फुल्लसोबत सातफेरे घेणार आहे. यावर्षाच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारी रोजी साहिलने मेघाला सरप्राईज दिलं. गोव्याच्या समुद्रकिनारी त्याने तिला अंगठी घालत प्रपोज केलं. त्याने समुद्रकिनारी सुंदर डेकोरेशन तयार करुन घेतलं होतं. फुलांचं भव्य हार्ट तयार केलं. त्यामध्ये 'विल यू मॅरी मी?' असं लिहिलं होतं. साहिलने गुडघ्यावर बसून तिला मेघाला पुष्पगुच्छ दिला. यावेळी मेघाने शॉर्ट रेड वनपीस घातला होता ज्यात ती सुंदर दिसत होती. तर साहिलने निळ्या रंगाचा सूट बूट घालून शोभून दिसत  होता. मेघाने प्रपोज करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. "नवीन वर्ष, नवी सुरुवात...आशीर्वाद आणि खूप आशेने २०२५ चं स्वागत करताना आम्हाला खास घोषणा करायची आहे. आम्ही लग्न करतोय. आमच्या प्रेमाचा प्रवास आता नवीन चॅप्टरपर्यंत आला आहे आणि हे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहत आहे. हे वर्ष प्रेम, आनंद आणि न संपणाऱ्या सेलिब्रेशनने भरपूर असावं. तुम्हाला सर्वांनाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा" असं तिने कॅप्शनमध्ये लिहिले.

मेघा चक्रवर्ती आणि साहिल २१ जानेवारी रोजी जम्मू येथे लग्न करणार आहेत. या लग्नसोहळ्यात कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र यांनाच आमंत्रण असणार आहे. लग्नाआधीचे विधी मेहंदी, हळद हे देखील होणार आहे. आयुष्याच्या नव्या टप्प्याची सुरुवात करण्यासाठी आम्ही आतुर आहोत असं मेघा म्हणाली. मेघाच्या पोस्टवर तिचा सहकलाकार गौरव मुकेश तसंच इतर कलाकार जिया शंकर, पारस अरोरा, अनेरी यांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

टॅग्स :टिव्ही कलाकारलग्नगोवा