Join us

'संस्कारी बहू' बनली अधिक बोल्ड, पहिल्यांदाच बॉयफ्रेंडसह दिसली अशा अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 10:32 IST

पहिले लग्न बंटी नेगीसह झाले होते. मात्र लग्नाच्या 10 वर्षानंतर काही कारणास्तव दोघांनी घटस्फोट घेतला.

सोशल मीडियावर सध्या हा फोटो खूप व्हायरल होत आहे. बिचवर एन्जॉय करणारे तिचे हे फोटो पाहून सारेच थक्क होत आहे. ऑनस्क्रीन या अभिनेत्रीला आपण अनेक मालिकांमध्ये पाहिले आहे. मालिकांमध्ये तिच्या अभिनयाप्रमाणे तिच्या लुक्सवरही सारेच फिदा होतात. सध्या ती अनेक बोल्ड फोटो शेअर करत सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून ती अभिनेत्री आहे काम्या पंजाबी. सध्या काम्याला प्रेमात आतंक बुडाली आहे. दिल्लीत राहणार शलभ डांगसह प्रेमात असल्याची कबुली तिने दिली होती. 

सध्या ती शलभ बरोबर व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. दुबई येथे दोघेही क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहेत.  पहिल्यांदाच तिने बॉयफ्रेंडस रोमान्स करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. पुढच्या वर्षी शलभ आणि काम्या लग्न करणार असल्याचेही काम्याने सांगितले आहे. काम्याचे शलभसह हे दुसरे लग्न असणार आहे. काम्याचे पहिले लग्न बंटी नेगीसह झाले होते.  मात्र लग्नाच्या 10 वर्षानंतर काही कारणास्तव दोघांनी घटस्फोट घेतला.

काम्या पंजाबी सध्या शक्ती अस्तित्व के एहसास की या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेलादेखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. या मालिकेची कथा ही सध्याच्या मालिकांपेक्षा खूप वेगळी असल्याने प्रेक्षकांना ती चांगलीच भावत आहे. या मालिकेत  रुबिना रुबिना दिलाइक तृतीयपंथीयाची भूमिका साकारत आहे. कोणत्याही अभिनेत्रीने मालिकेत तृतीयपंथीयाची भूमिका साकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेत काम्या रुबिनाच्या सासूच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.