Join us

जुई गडकरीने गायलं 'सैयारा'चं टायटल साँग, अभिनेत्रीचं चाहत्यांकडून होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 17:06 IST

'सैयारा'च्या टायटल साँगने अभिनेत्री जुई गडकरीलाही वेड लावलं आहे. जुईने सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेलं 'सैयारा'चं टायटल साँग गायलं आहे.

सध्या जिकडेतिकडे एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे 'सैयारा'ची. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ तर घातलाच आहे. पण, त्यासोबतच तरुणाईला या सिनेमाने वेड लावलं आहे. Gen Z मध्ये तर 'सैयारा'ची प्रचंड क्रेझ आहे. या सिनेमाच्या कथेने प्रेक्षकांच्या काळजावर थेट वारच केला आहे. जेवढं 'सैयारा'ला प्रेम मिळतंय तेवढंच त्यातील गाणीही प्रचंड हिट ठरली आहेत. 

'सैयारा'च्या टायटल साँगने अभिनेत्री जुई गडकरीलाही वेड लावलं आहे. जुईने सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेलं 'सैयारा'चं टायटल साँग गायलं आहे. याचा व्हिडिओ अभिनेत्रीने शेअर केला आहे. जुईच्या आवाजातील 'सैयारा'चं गाणं ऐकून चाहतेही भारावून गेले आहेत. तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी जुईचं कौतुक केलं आहे. 'सैयारा' सिनेमात हे साँग लोकप्रिय बॉलिवूड सिंगर श्रेया घोषालने गायलं आहे. 

दरम्यान, 'सैयारा' या सिनेमातून स्टारकिड असलेल्या अहान पांडे आणि अभिनेत्री अनीत पड्डा हिने पदार्पण केलं आहे. त्यांच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. मोहित सुरीने 'सैयारा'चं दिग्दर्शन केलं आहे. आत्तापर्यंत या सिनेमाने २९९.७५ कोटींची कमाई केली आहे. 

टॅग्स :जुई गडकरीटिव्ही कलाकार