Join us
Daily Top 2Weekly Top 5

या टीव्ही अभिनेत्रीला मिळत नाही काम,अशी ठेवतेय स्वतःला बिझी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 15:38 IST

गोपी बहु म्हणून घराघरांत पोहचलेली देवोलीना भट्टाचार्जी सध्या अंदमान निकोबार मध्ये सुट्टीचा आनंद लुटताना दिसते.कधी ती तिचे हॉट फोटोशूटमुळे ...

गोपी बहु म्हणून घराघरांत पोहचलेली देवोलीना भट्टाचार्जी सध्या अंदमान निकोबार मध्ये सुट्टीचा आनंद लुटताना दिसते.कधी ती तिचे हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते तर कधी व्हॅकेशन एन्जॉय करताना चर्चेत येते. सध्या ती कामाच्या शोधात असून तिला नवीन काम मिळत नसल्याचे माहिची मिळते.नवीन काम मिळत नसल्यामुळे ती सध्या फोटोशूट तर कधी इकडे तिकडे फिरण्यात आपला वेळ घालवताना दिसते.'साथ निभाना साथिया' मालिकेमुळेच देवोलिना प्रकाश झोतात आली होती हा शो 2017 मध्ये बंद झाला.यानंतर तिला दूसरा कोणताही प्रोजेक्ट मिळाला नाही.ती नवीन शो करण्यासाठी तयार आहे. परंतू तिला हवी तशी भूमिकाच सध्या तिला ऑफर होत नसल्यामुळे ती चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे.'साथ निभाना साथीया' मालिकेतून वेळ मिळाल्यानंतर देबोलिनाने टेली कॅलेंडर-२०१७ साठीही खास फोटोशूट केले होते.त्यावेळीही अतिशय हॉट अंदाजात तिच्या अदा कॅमे-यात कैद झाल्या होत्या.'साथ निभाना साथीयाँ'  या मालिकेतील गोपी बहूने अल्पावधीतच रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं.  गोपी बहु या भूमिकेमुळेच देबोलिना भट्टाचार्जीचे फॅन फॉलोईंगसुद्धा  वाढला होता.त्यामुळेच की काय मालिकेच्या एका भागाच्या शूटिंगसाठी देबोलिना 90 हजार ते 1 लाख रुपये इतके मानधन घेत असल्याचेही त्यावेळी चर्चा होत्या. आता देवोलिना संस्कारी बहुची इमेज ब्रेक करण्याचा प्रयत्नात आहे.त्यासाठीच तिने आपला लूक चेंज करण्यासाठी खूप फिटनेसवरही मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच  देबोलिनाने एक हॉट फोटोशूट केले होते.या फोटोशूटमधले निवडक फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून तिला खूप सारे कमेटस आणि लाईक्स मिळत असल्याचे पाहायला मिळाले.या फोटोशूटसाठी देबोलिनाने ब्लॅक कलरचा डिप नेक टॉप घातला होता.आणखी काही फोटो तिने पोस्ट केले असून त्यातही ती चांगली गॉर्जिअस दिसत आहे.सध्या मालिकेपेक्षाही वेब सिरीजची धूम पहायाला मिळत असल्यामुळे आता छोट्या पडद्यावरच्या या  गोपी बहुला वेब सिरीज करण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे.