Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीव्ही अभिनेत्री होण्याआधी एअरहोस्टेस होती दीपिका कक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 07:15 IST

'बिग बॉस 12' ची विनर बनली आणि आता 'कहां हम कहां तुम' ने ती पुन्हा टीव्हीवर परतली आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री बनण्यापूर्वी दीपिकाने 3 वर्षे एअरहोस्टेस म्हणून काम केले होते.

टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करने नुकतेच वयाची 33 वर्ष पूर्ण केली आहेत. इतरांप्रमाणे तिलाही खूप स्ट्रगल करावा लागला. सुरुवातीला दीपिका कक्कड़ला 'ससुराल सिमर का' मधून लोकप्रियता मिळाली.सिमर ही भूमिका तिने साकारली होती. यानंतर ती 'बिग बॉस 12' ची विनर बनली आणि आता 'कहां हम कहां तुम' ने ती पुन्हा टीव्हीवर परतली आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री बनण्यापूर्वी दीपिकाने 3 वर्षे एअरहोस्टेस म्हणून काम केले होते. दीपिकाने  दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की,  "एअरहोस्टेस म्हणून काम करत असताना काही मेडिकल इश्यूजमुळे जॉब सोडावा लागला होता. त्यावेळी नेमके काय करावे सुचेना,  मात्र त्यावेळी मला धीर दिला तो माझी बेस्टफ्रेंड आणि क्लासमेट सोनाली कुलकर्णीने. मला तिने टेन्शन न घेण्याचे सांगितले. ती मला म्हणाली, 'तू टीव्हीवर अभिनयासाठी का प्रयत्न करत नाही.'  मग ऑडिशंस द्यायला सुरूवात केली.

आणि योगा योगाने मला ऑफर्सही मिळत गेल्या. स्वतः सोनालीने माझा पोर्टफोलियो बनवला, अनेक लोकांशी माझा संपर्क करून दिला आणि ऑडिशंसमध्ये माझी मदत केली. तिच्यामुळे मी अभिनेत्री बनले. तिने मला अनेक ईमेल आयडी शेअर केले आणि माझा पोर्टफोलियो सर्क्युलेट केला. त्यानंतर मला ऑडिशंससाठी कॉल येणे सुरु झाले. विश्वास ठेवा माझ्या सुरुवातीच्या ऑडिशन खूप वाईट होत्या. ते पाहून आज मला आजही  स्वतःवर हसू येते."

'ससुराल सिमर का' या मालिकेत काम करत असतानाच तिला  शोएब इब्राहिम भेटला. सेटवरच मैत्री झाली आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले.  ब-याचदा  रिलेशनशिपबाबत या दोघांना विचारले जायचे. मात्र दोघांनीही मौनच पाळले होते. अखेर  दोघांनी तीन वर्षांपासून एकमेंकांच्या प्रेमात असल्याची जाहिर कबुली दिली होती. दोघांनी लग्न केले होते. 23 फेब्रुवारी 2019 ला दोघांनी आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली होती.

टॅग्स :दीपिका कक्कर