कृतिका कामराचा राग एवढ्यावरच थांबला नाही, तर तिने पुन्हा एक ट्विट करून लिहिले की, ‘शपथ घेऊन सांगते जर कोणी माझ्यासमोर बिग बॉस का घर है हे गाणे गायिले तर मी त्याचे तोंड फोडून टाकणार. कारण मी आता या शोला कंटाळली आहे.’ कृतिकाचा हा संताप बघून तिचे चाहतेही समर्थन करताना दिसत आहे. वास्तविक हा शो खरोखरच एका बोअरिंग वळणावर येऊन थांबला असे म्हटले तर चुकीचे ठरू नये.}}}} ">I swear if anybody sings “yeh big boss ka ghar hai” to me, I’m going to punch them in the face. Phew.. I’m done with that.}}}} ">— Kritika Kamra (@Kritika_Kamra) December 26, 2017
‘बिग बॉस’वर संतापली ही टीव्ही अभिनेत्री; म्हटले, ‘माझ्यासमोर नाव घेतले तर तोंड फोडून टाकेल’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 20:16 IST
बिग बॉसचा ११ वा सीजन खूपच रटाळवाणा असल्याच्या प्रतिक्रिया समोर येत असतानाच एक टीव्ही अभिनेत्री या शोवर भयंकर संतापल्याचे ...
‘बिग बॉस’वर संतापली ही टीव्ही अभिनेत्री; म्हटले, ‘माझ्यासमोर नाव घेतले तर तोंड फोडून टाकेल’!
बिग बॉसचा ११ वा सीजन खूपच रटाळवाणा असल्याच्या प्रतिक्रिया समोर येत असतानाच एक टीव्ही अभिनेत्री या शोवर भयंकर संतापल्याचे दिसून येत आहे. होय, अभिनेत्री कृतिका कामरा हिला या शोचा प्रचंड तिटकारा आला असून, त्याचे नाव ऐकनेदेखील ती पसंत करीत नाही. उलट तिच्यासमोर कोणी या शोचे नाव घेतले तर ती त्याचे चक्क तोंड फोडून टाकेल असा दम भरते. विशेष म्हणजे कृतिकाच्या या रोषाचे सर्वत्र समर्थन केले जात आहे. अनेकांच्या मते, वीकेंड का वारमध्ये सलमान खानची जादू अपयशी ठरत आहे. शिवाय घरातील इतर सदस्यांकडे कुठल्याही प्रकारचा मसाला उरलेला दिसत नाही. जणू काही प्रत्येकालाच ग्रॅण्ड फिनालेची प्रतीक्षा लागली आहे. घरात दमदार सदस्य असलेले हितेन तेजवानी आणि अर्शी खान हे बाहेर पडले आहे, तर लव त्यागी आणि पुनीश शर्मा हे कंटाळवाणे वाटत आहेत. एवढेच काय तर शोमध्ये बघण्यासारखे काही उरले नसल्याने त्यांच्या नातेवाइकांनाही घरात बोलाविले आहे. त्यामुळे हा शो चांगलाच रटाळवाणा होताना दिसत आहे. शिल्पा शिंदे आणि हिना खानची वागणूक पाहता त्यांना शोमध्ये पुढे काय होईल हे अगोदरच कळून चुकले असावे असेच दिसत आहे. दरम्यान, कृतिका कामराने ट्विटरच्या माध्यमातून आपला राग व्यक्त करताना म्हटले की, ‘किती बोरिंग एपिसोड आहे. मला असे वाटते की, आम्ही फॅमिली अॅँगलने हा शो बघून कंटाळलो आहोत. आता याच्यामध्ये काहीही मजा उरली नाही. नॉमिनेशन टास्कदेखील विचित्र पद्धतीने केले जात आहेत. त्याचबरोबर खूपच कमजोर कॉमेडी असल्याने हा शो आता प्रेक्षकांचा संयम बघत आहे.’