Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुणीतरी येणार गं! दिव्यांका त्रिपाठी पाठोपाठ आणखी एक टीव्ही अभिनेत्री होणार आई, घरी येणार नवा पाहुणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:22 IST

दिव्यांका त्रिपाठी पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने गुडन्यूज दिली आहे. बंदिनी फेम अभिनेत्री आसिया काजी लवकरच आई होणार आहे.

टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने काही दिवसांपूर्वीच आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. लग्नानंतर १० वर्षांनी दिव्यांका ४१व्या वर्षी त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. दिव्यांका त्रिपाठी पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने गुडन्यूज दिली आहे. बंदिनी फेम अभिनेत्री आसिया काजी लवकरच आई होणार आहे. आसिया काजीच्या घरी चिमुकल्याचं आगमन होणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ईदच्या दिवशी त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. 

आसियाने पती गुलशन नैनसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या हातात लहान बाळाचं टॉवेल आणि बूट दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी म्हटलं आहे की "नवीन चंद्र आणि एक नवीन चाप्टर... २०२६ मध्ये लवकरच येणार आहे. ईद मुबारक". आईबाबा होणार असल्याचा आनंद त्या दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

आसियाने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. 'धर्मपत्नी', 'मट्टी की बन्नो', 'हिटलर दीदी', 'ना बोले तुम ना मैने कुछ कहा २', 'तेनाली रामा', 'बालिका वधू' या लोकप्रिय मालिकांमध्ये ती दिसली होती. 'बंदिनी' या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. आसियाचा पती गुलशन नैनदेखील टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करतो. काही वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये लग्न केलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Aasiya Kazi announces pregnancy after Divyanka Tripathi's good news.

Web Summary : Following Divyanka Tripathi, actress Aasiya Kazi, known for 'Bandini,' is expecting. She shared the news with a video featuring baby items, announcing her pregnancy and expressing joy with her husband, Gulshan Nain. They married in November 2024.
टॅग्स :टिव्ही कलाकारगर्भवती महिला