Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिव्या खायला तयार राहावं लागणार आहे मला...! शशांक केतकरच्या या पोस्टचा अर्थ काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 10:44 IST

छोट्या पडद्यावरचा सर्वांचा आवडता अभिनेता शशांक केतकरला आता बहुधा शिव्या खाव्या लागणार... अर्थात हे आम्ही नाही तर खुद्द शशांक म्हणतोय.

ठळक मुद्देशशांकसोबतच या मालिकेत आशय कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आशयने ‘माझा होशील ना’ या मालिकेत डॉ. सुयशची भूमिका साकारली होती.

छोट्या पडद्यावरचा सर्वांचा आवडता अभिनेता शशांक केतकरला आता शिव्या खाव्या लागणार... अर्थात हे आम्ही नाही तर खुद्द शशांक म्हणतोय. शशांकने एक पोस्ट शेअर केली आहे. ‘माझ्या मते, शिव्या खायला तयार राहावं लागणार आहे मला,’ असे त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे. साहजिकच शशांकला कोणाच्या आणि का शिव्या खाव्या लागणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला. मात्र याच पोस्टमध्ये शशांकने त्याचेही उत्तर दिले. तर या शिव्यांचे कारण आहे, शशांकची नवी भूमिका.

होय, शशांक लवकरच एका नव्या कोºया मालिकेत दिसणार आहे. येत्या 1 मार्चपासून त्याची ‘पाहिले न मी तुला’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या भूमिकेत शशांक एका वेगळ्या आणि हटके भूमिकेत दिसणार आहे. अगदी प्रेक्षकांनी कल्पनाही केली नसणार अशा भूमिकेत. होय, आत्तापर्यंत नायकाच्या भूमिकेत दिसणारा शशांक या मालिकेतून प्रथमच निगेटीव्ह भूूमिकेत दिसणार आहे. आपली ही भूमिका प्रेक्षक कसे स्वीकारणार, याबाबत शशांक जरा साशंक आहे. त्यामुळेच आता मला शिव्या खाव्या लागणार, असे त्याने म्हटलेय.‘माझ्या मते, शिव्या खायला तयार राहावं लागणार आहे मला. एक अभिनेता म्हणून टीव्हीवर फार कमी वेळी प्रयोग करायला मिळतात,’ असे त्याने लिहिले आहे. शिवाय या ‘खतरनाक’ संधीसाठी झी, कोठारे व्हिजन, आदित्यनाथ कोठारे, उर्मिला कोठारे यांचे आभार..., असेही त्याने म्हटले आहे.

शशांकने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले असले तरी  ‘ होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळेच त्याला खरी ओळख मिळाली. या मालिकेमुळे शशांक तरुणीच्या गळ्यात ताईत बनला.  ‘पाहिले न मी तुला’ या त्याच्या मालिकेबद्दल सांगायचे झाल्यास, ही मालिका लवकरच झी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे. या मालिकेत शशांक एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत त्याची भूमिका काय असणार याविषयी  मालिकेच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहे. त्याची भूमिका काय असणार हे प्रेक्षकांसाठी सरप्राईज असणार आहे. 

शशांकसोबतच या मालिकेत आशय कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आशयने ‘माझा होशील ना’ या मालिकेत डॉ. सुयशची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. तसेच या मालिकेत तन्वी मुंडले हा नवीन चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :शशांक केतकर