Join us

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचुप उरकले लग्न, उदयपूरमध्ये झालेल्या विवाहचा पहिला फोटो आला समोर

By गीतांजली | Updated: October 21, 2020 19:30 IST

सध्या छोट्या पडद्यावरील कलाकारांच्या घरी लगीन घाई सुरु आहे.

सध्या छोट्या पडद्यावरील कलाकारांच्या घरी लगीन घाई सुरु आहे. कोरोना काळात दिलेल्या नियमांचे पालन करत अनेक कालाकार लग्नाच्या बेडीत अडकले. सध्या नेहा कक्कर, आदित्य नारायण आणि गौहर खानच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. नेहा कक्करच्या रोका सेरमनीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. यात दरम्यान छोट्या पडद्यावरील आणखी एक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकला आहे. 'एका था राजा एक थी रानी' फेम सरताज गिल याच्या लग्नाचा फोटो समोर आला आहे. सरताजने जसमीतसोबत उदयपूरमध्ये सात फेरे घेतले. उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये हा विवाह सोहळा पार पडला.  

समोर आलेल्या फोटोमध्ये त्याने आपल्या आऊटफिटला गुलाबी आणि सफेद रंगाने मॅच केले आहे. इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार दोघांच्या लग्नाच्या विधी 8 ऑक्टोबरपासून 11 ऑक्टोबरपर्यंत चालल्या. सरताजची पत्नी जसमीत फॅमिली बिझनेस सुशीश डायमंड्सची वाइस प्रेसिटेंड आहे. 

छोट्या पडद्यावरील सरताज गिल हा एक लोकप्रिय चेहरा आहे. त्याने 'एक था राजा एक थी रानी' आणि 'बेगूसराय' सारख्या शोमध्ये काम केले आहे. 2011मध्ये 'खाप' या सिनेमातून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 

टॅग्स :टेलिव्हिजन