लोकप्रिय अभिनेता पार्थ समथान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अनेक मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. मुळचा पुण्याचा आणि मराठी असलेला पार्थ हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. पार्थ समथानचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. हँडसम पार्थच्या गुड लूक्सवर मुली कायमच फिदा असतात. शाळेत असतानाही त्याची मुलींमध्ये क्रेझ होती असा खुलासा अभिनेत्याने मुलाखतीत केला होता. पार्थने शाळेतील त्याच्या गर्लफ्रेंडचा एक भयानक किस्साही सांगितला.
एका मुलाखतीत पार्थ म्हणाला होता की "शाळेत असताना अनेक मुलींना मी आवडायचो. त्यातल्याच एकीसोबत मी रिलेशनशिपमध्येही होतो. ती मुलगी माझ्यासाठी वेडी होती. एक दिवस तिने तिच्या छातीवर कर्कटकाने माझं नाव लिहिलं. ते पाहून मी खूप घाबरलो होतो. सायको(मनोरुग्ण) लोकच असं काहीतरी करू शकतात. मी तिला समजावलं होतं आणि त्यानंतर मी तिच्याशी कधीच बोललो नाही. मी माझ्या चाहत्यांनाही हेच सांगतो की असे खतरनाक स्टंट करायला जाऊ नका. तुम्ही प्रेम करत असाल पण कोणच्याही इतकं अधीन होऊ नका. कोणासाठी अशी सायकोगिरी करू नका".
पार्थने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. कैसी ये यारियां, कसौटी, ये है आशिकी, गुमराह, प्यार तुने क्या किया यांसारख्या मालिकांमध्ये दिसला. सध्या तो कलर्सवरील 'सेहर होने को है' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
Web Summary : Actor Parth Samthaan shared a shocking incident from his school days, revealing his girlfriend carved his name on her chest. He was terrified and warned fans against such extreme acts of love.
Web Summary : अभिनेता पार्थ समथान ने स्कूल के दिनों का एक चौंकाने वाला किस्सा साझा किया, जिसमें उन्होंने बताया कि उनकी गर्लफ्रेंड ने उनकी छाती पर उनका नाम गुदवा लिया था। वह डर गए और प्रशंसकों को प्यार में ऐसे चरम कदम उठाने के खिलाफ चेतावनी दी।