नववर्षाच्या सुरुवातीलाच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा संसार मोडला आहे. हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता कृप कपूर सूरीचा घटस्फोट झाला आहे. लग्नानंतर ११ वर्षांनी कृप पत्नी सिमरन कौरपासून विभक्त झाला आहे. कृपची एक्स पत्नी सिमरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली आहे.
टेली चक्करने दिलेल्या रिपोर्टनुसार, कृप आणि सिमरनच्या नात्यात दुरावा आला होता. त्यांच्यात वाद सुरू होते. २०२४च्या सुरुवातीलाच ते वेगळे होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्या अफवा असल्याचं कृपने म्हटलं होतं. त्यानंतर कृप आणि सिमरन यांनी त्यांचं लग्न वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, नात्यात सुधारणा न झाल्यामुळे अखेर कायदेशीररित्या घटस्फोट घेत ते वेगळे झाले आहेत. कृपच्या एक्स पत्नीने पोस्टमध्ये म्हटलं आहे की "तुझ्यापासून वेगळं होणं हा माझा कमकुवतपणा नव्हता. तर स्वत:शी प्रामाणिक राहणं हे माझं ध्येय होतं. मला पुन्हा नवीन सुरुवात करण्याचा आणि कोणतीही अपराधाची भावना न ठेवता हसण्याचा अधिकार आहे. या लव्ह मॅरेजचा सन्मानाने शेवट होत आहे".
कृप आणि सिमरन यांनी दोनदा लग्न केलं होतं. ६ डिसेंबर २०१४ रोजी त्यांच्या लग्नाचा मुहुर्त होता. मात्र त्याच दिवशी सकाळी कृपच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं. मात्र तेव्हा कृपने सिमरनच्या भांगेत कुंकू भरत तिच्याशी लग्न केलं आणि तिला सून म्हणून घरी आणलं होतं. त्यानंतर २०१८ मध्ये पारंपरिक पद्धतीने कृप आणि सिमरन यांनी नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केलं. २०२० मध्ये सिमरन आणि कृपला कन्यारत्न झालं. त्यांची मुलगी आता ५ वर्षांची आहे.
Web Summary : Actor Krrip Kapur Suri and his wife Simran Kaur are divorced after 11 years. Simran announced the split on social media, citing a need for honesty and a fresh start. They married twice, first informally, then traditionally in 2018, and have a 5-year-old daughter.
Web Summary : अभिनेता कृप कपूर सूरी और उनकी पत्नी सिमरन कौर का 11 साल बाद तलाक हो गया। सिमरन ने सोशल मीडिया पर अलग होने की घोषणा करते हुए ईमानदारी और नई शुरुआत की आवश्यकता बताई। उन्होंने दो बार शादी की, पहले अनौपचारिक रूप से, फिर 2018 में पारंपरिक रूप से, और उनकी एक 5 साल की बेटी है।