Join us
Daily Top 2Weekly Top 5

Tunisha Sharma : नवा ट्विस्ट! तुनिशाने शीझानच्या आईला सांगितलेली 'दिल की बात'; समोर आले 'ते' WhatsApp चॅट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 15:51 IST

Tunisha Sharma : अभिनेत्रीच्या आत्महत्येचे गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. याच दरम्यान, शीझानच्या कुटुंबीयांनी आता तुनिशासोबत केलेल्या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) आत्महत्या केली आहे. तुनिशा आणि शीझान खानचे कुटुंबीय एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. अशा परिस्थितीत अभिनेत्रीच्या आत्महत्येचे गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. याच दरम्यान, शीझानच्या कुटुंबीयांनी आता तुनिशासोबत केलेल्या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. कुटुंबीयांनी तुनिषा शर्मासोबतच्या Whatsapp संभाषणाचा एक स्क्रीनशॉट जारी केला आहे. चॅटमध्ये तुनिशा शीझानच्या आईशी बोलताना दिसत आहे. 

तुनिशाच्या चॅटचा हा स्क्रीनशॉट 6 ऑक्टोबरचा आहे. त्यादिवशी रात्री 11.30 वाजता तुनिशाने शीझान खानच्या आईला मेसेज केला आणि विचारलं - झोपलात का? पण शीझानच्या आईने तिच्या मेसेजला रिप्लाय दिला नाही. त्यानंतर 6 दिवसांनी 12 ऑक्टोबरला तुनिषाने पुन्हा शीझानच्या आईला मेसेज केला. तुनिशाने तिच्या मेसेजमध्ये लिहिले- "जेव्हा माझ्यासोबत कोणीही उभं नसतं, तेव्हा मला माहीत आहे की तुम्ही आणि आपी (फलक नाज) नेहमीच उभे राहाल."

""बेटा तू सदैव आनंदी राहा"

"तुम्हा दोघांवर माझं खूप प्रेम आहे, काळजी करू नका, सगळं ठीक होईल, मी इथे तुमच्यासोबत आहे…". या मेसेजला उत्तर देताना शीझानच्या आईने लिहिलं होतं की - "बेटा तू सदैव आनंदी राहा, तुझी तब्येत ठीक राहो. या चॅटच्या माध्यमातून तुनिशाचे तिच्या आईसोबतचे संबंध चांगले नव्हते आणि त्यामुळे ती शीझानच्या आईच्या खूप जवळ होती, हे सांगण्याचा प्रयत्न शीझानच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"तुनिशाकडे नसायचे पैसे, तिने माझ्याकडे 3 हजार उधार मागितलेले"

तुनिषा शर्माच्या मैत्रिणीने अभिनेत्रीबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. 'आज तक' या न्यूज पोर्टलशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे. तुनिषा शर्माची मैत्रीण आणि माजी को स्टार असलेल्या सोनिया सिंहने खुलासा केला की तुनिशा काही आठवड्यांपासून नाराज होती, त्यामुळे तिच्याशी कमी बोलणं व्हायचं. "तुनिशाकडे अनेकदा पैसे नसायचे. काही दिवसांपूर्वी तिने माझ्याकडे 3000 रुपये उधार मागितले होते, मग मी तिला विचारलं की काय झालं इतकेही पैसे नसायला. तुनिशाच्या मृत्यूच्या एक दिवस आधी तिने फोन केला होता आणि आपण तिच्यासोबत असल्याचे तिच्या आईला खोटं सांगण्यास सांगितलं होतं" असंही सोनिया म्हणाली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :तुनिशा शर्मा