Join us

"तुम को हमारी उमर लग जाये...", अनघा अतुलची वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 17:09 IST

Anagha Atul : 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री अनघा अतुल हिने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

'वेध भविष्याचा' आणि 'घेतला वसा टाकू नको' या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष लोकप्रिय झालेले गुरुजी म्हणजे अतुलशास्त्री भगरे गुरुजी. आपल्या ज्योतिषशास्त्रामुळे भगरे गुरुजी यांनी मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. भगरे गुरुजींप्रमाणेच त्यांची लेक अनघा(Anagha Atul)देखील तितकीच लोकप्रिय आहे. तिने रंग माझा वेगळा मालिकेतून टेलिव्हिजन जगतात पदार्पण केले. तिने साकारलेल्या श्वेताने प्रेक्षकांच्या मनात घर केले. सध्या ती पिरतीचा वनवा उरी पेटला मालिकेत पाहायला मिळत आहे. दरम्यान आता तिने तिच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

अनघाने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा. तुम्हें और क्या दूँ मैं दिल के सिवाय, तुम को हमारी उमर लग जाये. अनघाच्या या पोस्टवर सेलिब्रेटीदेखील तिच्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. 

अनघाने सुरुवातीच्या काळात महेश कोठारे यांच्या 'कोठारे व्हिजन'मध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून काम केले आहे. तिने ‘अनन्या’या नाटकामध्ये अनन्याची मैत्रीण प्रियांका ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर ती रंग माझा वेगळा मालिकेत श्वेताच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यानंतर आता ती पिरतीचा वनवा उरी पेटला या मालिकेत काम करते आहे. या शिवाय तिने वदनी कवळ नामक स्वतःचे पुण्यात हॉटेल सुरू केले आहे.