Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुला शिकवीन चांगलाच धडा'मध्ये रंगणार दिवाळीचा सण, लग्नानंतरच्या पहिल्या पाडव्यासाठी अधिपती अक्षराला देणार खास भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 16:10 IST

'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत ही अक्षरा- अधिपतीची पहिली दिवाळी साजरी करतायेत.

नव्या जोडप्याला लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीची जितकी उत्सुकता असते तितकीच आवर्जून प्रतीक्षा असते दिवाळीतल्या पाडव्याची. झी मराठीवर 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ह्या मालिकेत ही अक्षरा- अधिपतीची पहिली दिवाळी आहे आणि अक्षरा ही दिवाळी खास बनविण्या करिता  स्वतः आकाश कंदील बनवतेय, जो पाहून अधिपती तिच्या पुन्हा प्रेमात पडतो. अक्षराने बनवलेला आकाश कंदील अधिपती कौतुकाने घरासमोर लावतो. 

भुवनेश्वरी  तो कंदील पाहते आणि अधिपती कडे हट्ट धरते, की तिने आणलेला आणि सूर्यवंशींच्या श्रीमंतीला शोभेल असाच आकाश कंदील घरासमोर लागला पाहिजे. आता अधिपती, आईचा हट्ट पुरवणार की बायकोच मन सांभाळणार? अक्षराचा लग्नानंतरचा हा पहिलाच पाडवा आहे त्यामुळे मास्तरीणबाईंना काहीतरी खास द्यायचं म्हणून अधिपती देणार आहे  अशी एक वस्तू ज्यामुळे मास्तरीणबाईंचा चेहरा आनंदानी फुलून जाणार आहे. पण भुवनेश्वरी हातावर हात ठेऊन बसणार नाही.

 तिला ही माहिती आहे कि सूनबाईची पहिली दिवाळी आहे तर अधिपती काही तरी वेगळ करणार अक्षरासाठी. तर भुवनेश्वरी ही दिवाळीची अशी भेट सूनबाईला देणार कि घरात सर्वांना धक्का बसणार. सूर्यवंशींची ही दिवाळी एक्दम धमाकेदार असणार. काय होईल जेव्हा भुवनेश्वरीला कळेल अधिपतीच्या खास दिवाळी भेटीबद्दल? हे आपल्याला लवकरच कळेल.  

टॅग्स :दिवाळी 2023सेलिब्रिटींची दिवाळी