Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुला शिकवीन चांगलाच धडा'मध्ये मास्तरीण बाईंच्या लग्नाची बातमी समजल्यावर अधिपतीची झाली अशी अस्वस्थ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 07:00 IST

अक्षराचे लग्न ठरले आहे हे पाहून अधिपतीला फारच धक्का बसणार आहे.

झी मराठी वरील "तुला शिकवीन चांगलाच धडा" ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. भुवनेश्वरी, अधिपती आणि अक्षरा ही पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतायत. ह्या मालिकेत प्रेक्षकांनी आतापर्यंत पहिले की अक्षरा बरोबर कमलचं लग्न ठरलं आहे. ह्या लग्नाची पत्रिका अक्षराचे बाबा अधिपतीला देतात. अक्षराचे लग्न ठरले आहे हे पाहून अधिपतीला फारच धक्का बसणार आहे, अधिपतीचे अक्षरावर प्रेम आहे ज्याची अक्षराला अजिबात कल्पना नाही. 

मनातून खचलेला अधिपती स्वतःलाच दोष देत एकांतात एका नदीकाठी बसतो, अधिपतीने दिलेल्या या इमोशनल सीन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे, खूप लोकांनी त्याच्या या कामाचं कौतुक केलंय.

मी  मास्तरीण बाईंसाठी आईसाहेबांकडे भांडलो, हि सगळी शिकलेली माणसे अशीच धोका देतात असे म्हणत, मित्रांजवळ अधिपती आपली व्यथा मांडतो.  दुसरीकडे अक्षराकडे लग्नाची धामधूम चालू आहे. अक्षरा सहित सर्व कुटुंबीय आनंदात आहेत. अक्षरांचे हात मेहेंदीने रंगणार आहेत. तेव्हा अक्षरा आणि अधिपतीच्या नात्याला इथेच  पूर्णविराम लागणार की वेगळ काही घडणार? हे पाहण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. 

टॅग्स :झी मराठी