Join us
Daily Top 2Weekly Top 5

विक्रांत आणि ईशाची रब ने बना दी जोडी, सरंजामे-निमकर कुटुंबात लगीनघाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 11:54 IST

सोशल मीडियावर यांच्या लग्नाच्या प्रि-सेलिब्रेशनचे काही व्हीडीओ आणि फोटो समोर आले आहेत. यांत संरजामे कुटुंबिय वेगवेगळ्या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळत आहेत.

वय विसरायला लावणारं प्रेम ही संकल्पना असलेली मालिका आता एका महत्वपूर्ण टप्प्यावर आली आहे. सध्या मालिकेत विक्रांत आणि ईशा म्हणजेच विकीशाच्या लग्नाची जोरदार तयारी चालू आहे. विक्रांतने ईशाला लग्नाची मागणीदेखील एका वेगळ्या आणि शाही पद्धतीने घातली त्यामुळे त्यांचा लग्नसोहळा देखील तितकाच दिमाखदार असणार यात शंकाच नाही. सध्या सगळीकडे विक्रांत आणि इशा यांच्या शाही लग्नपत्रिकेची चर्चा चालू आहे.

 

 

नुकतंच मालिकेत देखील या आगळ्या वेगळ्या लग्नपत्रिकेची झलक पाहायला मिळाली. हि पत्रिका चांदीच्या पत्र्यावर कोरलेली आहे. पत्रिकेसोबत एक सोन्याचा गणपती, चांदीचा करंडा, अत्तरदाणी, दिवा आणि मोती आहेत. ही एक लग्न पत्रिका १.५ लाखांची आहे.

 

इतकंच नव्हे तर लग्नाच्या आमंत्रणासोबत आमंत्रकांना पोशाख आणि काही भेटवस्तू देखील देण्यात येणार आहेत. संगीत, मेहंदी, हळद, साखरपुडा आणि विवाहसोहळा भोरमध्ये अगदी धुमधडाक्यात आणि शाही अंदाजात पार पडणार आहे. आता आमंत्रण जर इतकं शाही असेल तर विवाह सोहळा किती भव्य असेल याची कल्पना देखील आपण करू शकतो.

 

तेव्हा इशा आणि विक्रांत म्हणजेच विकिशा यांच्या लग्नाचा दिमाखदार सोहळा अनुभवायला आणि या नवं दाम्पत्याला आपले शुभाशीर्वाद द्यायला लग्नाचा मुहूर्त चुकवू नका १३ जानेवारीला रंगणा-या या ऑनस्क्रीन लग्नासाठी सा-यांच्याच नजरा लागल्या आहेत.

तर लग्नात असे होणार संगीत सेरेमनी, या गाण्यावर थिरकणार 'विकीशा' 

तसेच सिनेमात रंगणा-या विवाहसोहळा प्रमाणेच मालिकेतही लग्नाच्या आधी संगीत पाहायला मिळणार आहे. सध्या कपलच्या संगीत सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. सोशल मीडियावर यांच्या लग्नाच्या प्रि-सेलिब्रेशनचे काही व्हीडीओ आणि फोटो समोर आले आहेत. यांत संरजामे कुटुंबिय वेगवेगळ्या  गाण्यावर थिरकताना पाहायला मिळत आहेत.

 

विशेष म्हणजे  आईसाहेब आणि जयदीपनेही या सोहळ्यात थिरकल्याचे पाहायला मिळत आहे.तसेच विक्रांत आणि इशाही  एकत्र खास परफॉर्मन्स देणार आहेत. त्यामुळे रिल असले तरी रिअल लाईफप्रमाणेच हा सोहळा भव्य दिव्य रंगणार यांत शंका नाही. 

टॅग्स :तुला पाहते रे