Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुला पाहते रे'मधील विकिशाच्या लग्नाबाबतची 'ही' खास गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 12:23 IST

विकिशाच्या लग्नाच्या सर्व विधी तसेच हळद, मेहंदी, संगीत, साखरपुडा हे समारंभ भोर मध्ये अगदी धुमधडाक्यात आणि निर्विघ्नपणे पार पडले.

ठळक मुद्देविकिशाचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला २०० किलो पेढ्यांचा वाटप करून प्रेक्षकांचं तोंड गोड करण्यात आलं

मराठी मालिकांमध्ये बऱ्यापैकी नायक आणि नायिका यांच्या लग्नाला प्राधान्य असते. सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेली झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'तुला पाहते रे' मधील विकिशाचं म्हणजेच विक्रांत आणि इशा यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होती. सर्व प्रेक्षकांना ज्या लग्नाचे वेध लागले होते तो नवीन वर्षातील पहिलाच शाही लग्नसोहळा संपन्न झाला. विकिशाच्या लग्नाच्या सर्व विधी तसेच हळद, मेहंदी, संगीत, साखरपुडा हे समारंभ भोर मध्ये अगदी धुमधडाक्यात आणि निर्विघ्नपणे पार पडले. विक्रांत सरंजामेसारख्या मोठ्या बिझनेसमनच लग्न म्हंटल्यानंतर त्या लग्नात भव्यता पण तितकीच होती.

महाराष्ट्रातील तमाम मराठी आणि इतर भाषिक रसिक प्रेक्षक या जोडीवर आणि मालिकेवर प्रेमाचा वर्षाव करतात आणि त्यांची लाडकी जोडी विवाहबंधनात अडकली याचा आनंद प्रेक्षकांत देखील तितक्याच जोशात साजरा झाला.

इशा आणि विक्रांत यांच्या लग्न सोहळ्या निमित्त कोल्हापूर, नागपूर, डोंबिवली, दादर आणि ठाणे येथे २०० किलो पेढ्यांचा वाटप करून प्रेक्षकांचं तोंड गोड करण्यात आलं. तुला पाहते रे ही मालिका प्रेक्षकांसाठी फक्त टीव्ही पुरतीच मर्यादित राहिली नसून त्यातील व्यक्तिरेखा या प्रेक्षकांमधील एक झाल्या आहेत हे यावरून लक्षात येतं. विकिशाच्या लग्नाचा आनंद साजरा करून प्रेक्षकांनी मालिकेबद्दलची त्यांची भावना व्यक्त केली आणि ते मालिकेवर असाच प्रेमाचा वर्षाव करत राहतील यात शंकाच नाही.

टॅग्स :तुला पाहते रेसुबोध भावे गायत्री दातार