Join us
Daily Top 2Weekly Top 5

Tula Pahate Re Memes: सोशल मीडियावरील धम्माल मिम्स आणि विनोदांचा भडिमार, एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 17:57 IST

विकीशाच्या लग्न सोहळ्याची सर्वत्रच चर्चा रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑनस्क्रीन रंगणा-या या विवाहसोहळ्याची सगळ्यांनाच उत्सुकता असून दुसरीकडे मात्र सोशल मीडियावर तर विकीशाच्या लग्नाची खिल्ली उडवणारे मिम्स आणि विनोदांचा भडिमार सुरु आहे.

''वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी 'तुला पाहते रे' मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली आहे.त्यांच्या प्रेमाची गोष्ट जाणून घेण्यासाठी आणि त्यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी रसिक उत्सुक होते. अखेर तो क्षण आला आणि सध्या मालिकेत  इशा आणि विक्रांत यांचा विवाहसोहळा पाहायला मिळत आहे. एकीकडे या विवाहसोहळ्यामुळे मालिकेत रंजक वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. विकीशाच्या लग्न सोहळ्याची सर्वत्रच चर्चा रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑनस्क्रीन रंगणा-या या विवाहसोहळ्याची सगळ्यांनाच उत्सुकता असून दुसरीकडे मात्र सोशल मीडियावर तर विकीशाच्या लग्नाची खिल्ली उडवणारे मिम्स आणि विनोदांचा भडिमार सुरु आहे. सोशल मीडियावर हे मिम्स आणि विनोद जबरदस्त ट्रेंडिंग आहेत. नेटिझन्सनी अनेक फोटो, विनोद सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पाहूया सोशल मीडियावरील हेच धम्माल मिम्स आणि विनोद.