Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही अभिनेत्री एका मालिकेत साकारतेय मुख्य भूमिका, या ग्लॅमरस फोटोत तिला ओळखणेही होतेय अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 15:44 IST

झी मराठी या वाहिनीवर तुला पाहते रे ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेत गायत्री दातार इशा ही भूमिका साकारत आहे.

ठळक मुद्देगायत्री दातार तुला पाहते रे या मालिकेत साकारत असलेली ईशा निमकर ही अत्यंत साधी आणि सोज्वळ मुलगी आहे. मालिकेत ती नेहमीच पंजाबी ड्रेस अथवा भारतीय पेहरावातच पाहायला मिळते. पण ती तिच्या खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.ती भारतीय पेहरावासोबतच वेर्स्टन कपडे घालणे देखील पसंत करते. तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर ती नेहमीच फोटो पोस्ट करत असते.

तुला पाहाते रे या मालिकेत इशाची भूमिका साकारणारी गायत्री दातार मालिकेत नेहमीच पंजाबी ड्रेस अथवा भारतीय पेहरावातच पाहायला मिळते. पण ती तिच्या खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. ती भारतीय पेहरावासोबतच वेर्स्टन कपडे घालणे देखील पसंत करते. तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर ती नेहमीच फोटो पोस्ट करत असते. या तिच्या फोटोंना तिचे चाहते आवर्जून लाइक करतात. तसेच या फोटोंवर प्रतिक्रिया देखील देतात. 

'तुला पाहते रे' ही मालिका सध्या तुफान गाजतेय. ही मालिका सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 'तुला पाहते रे' मालिकेतील ईशा निमकर ही प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. पुण्याच्या गायत्रीने या मालिकेतून प्रमुख भूमिका सादर करत टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले आहे. पदार्पणातच तिला सुबोध भावे सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि या संधीचं तिने सोनं केले आहे. 

गायत्री दातार मालिकेत साकारत असलेली ईशा निमकर ही अत्यंत साधी आणि सोज्वळ मुलगी आहे. तिला जगातील छक्के पंजे कळत नाही. तसेच घरातील परिस्थितीमुळे तिची काही हौस-मौज तिला करता येत नाही. पण खऱ्या आयुष्यात गायत्री स्वतः खूप अॅडव्हेंचरस आहे. तिला ट्रेकिंगची तसेच फिरायची खूप आवड आहे. गायत्रीने मनालीला ट्रेकिंगचा आणि कोयना नदीत रिव्हर राफ्टिंगचा धमाल अनुभव घेतलेला आहे. गायत्रीने अनेक निर्सगरम्य ठिकाणी भेट दिली आहे त्यातील एक म्हणजे लेह लडाख. तिचे हे सर्व अनुभव तिने तिच्या सोशल मीडियावर फोटोंच्या रूपात शेअर केले आहेत.

मालिकेतील गोंधळली ईशा खऱ्या आयुष्यात स्पष्टवक्ती आणि कॉलेजमध्ये प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेणारी उत्साही मुलगी आहे. गायत्रीचा हा वेगळा पैलू तिच्या चाहत्यांसमोर येत आहे. ऑनस्क्रीन साधी सरळ ईशा आणि ऑफस्क्रीन अॅडव्हेंचरस गायत्री या दोघींवर प्रेक्षक तितकाच प्रेमाचा वर्षाव करतात यात शंकाच नाही.

वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी असलेल्या 'तुला पाहते रे' या मालिकेतील गायत्रीला या मालिकेमुळे खूपच कमी दिवसांत प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग मिळाले आहे यात काही शंकाच नाही. 

टॅग्स :गायत्री दातारतुला पाहते रे