स्वत:चं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हक्काचं घर घेण्यासाठी प्रत्येक कुटुंब प्रयत्न करत असतं. एका मराठी अभिनेत्रीच्या कुटुंबाचं स्वप्नदेखील पूर्ण झालं आहे. झी मराठीच्या नायिकेने नुकतंच कुटुंबासह नव्या बंगल्यात गृहप्रवेश केला आहे. सेलिब्रिटींनीही तिच्या गृहप्रवेशाला हजेरी लावली होती. अभिनेत्रीच्या नव्या बंगल्यातील गृहप्रवेशाचे फोटो समोर आले आहेत.
तुला जपणार आहे फेम अभिनेत्री महिमा म्हात्रे हिने कुटुंबीयांसह नव्या बंगल्यात गृहप्रवेश केला आहे. सोशल मीडियावरुन तिने काही फोटो शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. नव्या घराची वास्तुशांती पूजा आणि गृहप्रवेश नुकताच पार पडला. अभिनेत्रीचं संपूर्ण घर हे सुंदर फुलांच्या माळांनी सजविण्यात आलं होतं. महिमा म्हात्रेच्या या नवीन घराची खास गोष्ट म्हणजे या घरात तिने स्वत:च्या ट्रॉफी ठेवण्यासाठी खास कॉर्नर करून घेतला आहे.
महिमा 'तुला जपणार आहे' मालिकेत मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे. या मालिकेत ती मीरा हे पात्र साकारते आहे. याशिवाय तिने अन्य काही मालिकांमध्येही काम केलं आहे. 'खमंग नात्याचा गोडा मसाला', 'दार उघड बये', 'जाऊ नको दूर बाबा', 'आई मायेचं कवच' या मालिकांमध्ये ती दिसली होती. याशिवाय 'आँख मिचोली' या हिंदी मालिकेतही तिने काम केलं आहे.
Web Summary : Mahima Mhatre, star of 'Tula Japnar Aahe,' celebrated her new home's housewarming with her family. The actress shared photos of the beautifully decorated house. She is known for roles in series like 'Khamang Natyacha Goda Masala' and 'Aankh Micholi'.
Web Summary : 'तुला जपणार आहे' की अभिनेत्री महिमा म्हात्रे ने परिवार के साथ नए घर में गृहप्रवेश किया। अभिनेत्री ने खूबसूरती से सजे घर की तस्वीरें साझा कीं। वह 'खमंग नात्याचा गोडा मसाला' और 'आँख मिचोली' जैसे धारावाहिकों में भूमिकाओं के लिए जानी जाती हैं।