Join us

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गायकवाडांच्या घरी येणार नवा पाहुणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 20:18 IST

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते.

ठळक मुद्देया मालिकेने पाहता पाहता नुकताच ७५० भागांचा टप्पा पार केलाया मालिकेत लवकरच एक नवीन पाहुणा येणार आहे

झी मराठीवरीलतुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने पाहता पाहता नुकताच ७५० भागांचा टप्पा पार केला. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आहेत आणि त्या तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत.

या मालिकेत लवकरच एक नवीन पाहुणा येणार आहे. गायकवाड घराण्याची धाकटी सून म्हणजेच नंदिता गायकवाड हिच्याकडे आनंदाची बातमी आहे. मालिकेत नंदिताने या गोड बातमीचा घरी उलगडा केला पण चाहत्यांसाठी मालिकेतल्या कलाकारांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

यात राणा, अंजली, सुरज, बरकत आणि नंदिता हे सगळे ‘कुणीतरी येणार येणार गं’ या गाण्यावर थिरकले. हि आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करण्याचा हा फंडा हटके असल्यामुळे चाहत्यांनी देखील या व्हिडीओला डोक्यावर उचलून धरलं. अगदी कमी वेळातच या व्हिडीओला ५० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अंजली आणि राणा नव्हेच तर बरकत, नंदिता वहिनी, चंदे ही सगळी पात्रं महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहेत. या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजनच नाही केलं तर कुस्ती या खेळाचं महत्त्व देखील दर्शवलं. अंजली आणि राणा यांची हृदयस्पर्शी प्रेमकथा, कठीण परिस्थितीत न डगमगता, एकमेकांच्या साथीने प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्याची दोघांची वृत्ती प्रेक्षकांना भावली. लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचे आजही तितकेच प्रेम मिळत आहे.

टॅग्स :तुझ्यात जीव रंगलाझी मराठी