Join us

तुझ्यात जीव रंगला मधील अंजली म्हणजेच अक्षया देवधरचा हा स्टायलिश लूक पाहून पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 17:31 IST

अक्षया तुझ्यात जीव रंगला या मालिकेत नेहमीच आपल्याला साडींमध्ये पाहायला मिळते. पण खऱ्या आय़ुष्यात ती खूपच मॉडर्न असून अनेकवेळा ती वेस्टर्न कपडे घालते.

ठळक मुद्देअक्षयाच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला तिचे स्टायलिश लूकमधील अनेक फोटो पाहायला मिळतात. हे फोटो तिच्या फॅन्सना खूप आवडत असून ते नेहमीच तिची भरभरून स्तुती करतात. 

तुझ्यात जीव रंगला या मालिकेमध्ये सध्या ट्विस्ट आला असून प्रेक्षकांचा लाडका राणा दाचे निधन झाले असल्याचे त्याच्या घरातल्यांना वाटत आहे. या सगळ्यामुळे अंजली प्रचंड दुःखी आहे. या मालिकेत आता पुढे काय होणार याचा अंदाज प्रेक्षक लावत आहेत. या मालिकेत अंजलीची भूमिका अक्षया देवधर साकारते. या मालिकेमुळे अक्षयाला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेम करतात. त्यामुळे त्या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहाण्याची प्रेक्षक वाट पाहात आहेत. 

अक्षया तुझ्यात जीव रंगला या मालिकेत नेहमीच आपल्याला साडींमध्ये पाहायला मिळते. पण खऱ्या आय़ुष्यात ती खूपच मॉडर्न असून अनेकवेळा ती वेस्टर्न कपडे घालते. तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला तिचे स्टायलिश लूकमधील अनेक फोटो पाहायला मिळतात. हे फोटो तिच्या फॅन्सना खूप आवडत असून ते नेहमीच तिची भरभरून स्तुती करतात. 

तुझ्यात जीव रंगला या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रोमोत हार्दिक आता प्रेक्षकांना डॅशिंग अंदाजात पाहायला मिळत असून कुस्ती खेळणारा हार्दिक आता चक्क चोर बनला आहे. त्याचे नाव राजा राजगोंडा असून त्याला सगळे आर आर म्हणून ओळखतात. मारामारी करणारा जीन्स, टी-शर्ट आणि गॉगलमधील हार्दिक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या टीमला खात्री आहे आणि विशेष म्हणजे नव्या लूकमध्ये हार्दिकच्या मिशीची स्टाईल देखील वेगळी आहे. 

हार्दिकने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला तुझ्यात जीव रंगला या मालिकेचा हा प्रोमो प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे. मालिकेत हार्दिकची रिएंट्री होत असल्याने त्याचे फॅन्स प्रचंड खूश आहेत. त्याचा हा नवा लूक त्याच्या चाहत्यांना आवडत असल्याचे ते प्रतिक्रियांद्वारे सांगत आहेत. आता प्रेक्षकांचा लाडका राणा दा आणि अंजली यांची भेट कधी होणार याची उत्सुकता त्यांच्या फॅन्सना लागली आहे. 

टॅग्स :तुझ्यात जीव रंगलाअक्षया देवधर