Join us

तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या सेटवर या कारणामुळे झाले सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 20:00 IST

राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने नुकताच ७५० भागांचा टप्पा पार केला.

ठळक मुद्दे७५० भागांचा माईलस्टोन पार केल्यानंतर सेलिब्रेशन तर जोरातच होणार... या मालिकेच्या टीमने हा आनंद केक कापून साजरा केला. यावेळी मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. चित्रीकरणानंतर सगळ्यांनी मिळून धमाल पार्टी केली.

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने नुकताच ७५० भागांचा टप्पा पार केला.

राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आहेत आणि त्या तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत.

७५० भागांचा माईलस्टोन पार केल्यानंतर सेलिब्रेशन तर जोरातच होणार... या मालिकेच्या टीमने हा आनंद केक कापून साजरा केला. यावेळी मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. चित्रीकरणानंतर सगळ्यांनी मिळून धमाल पार्टी केली. या वेळी मालिकेच्या संपूर्ण टीमचे आभार मानण्यात आले. तुझ्यात जीव रंगला या कार्यक्रमावर प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम असून त्यांनी या मालिकेतील सगळ्या व्यक्तिरेखा अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेत हार्दिक जोशी, अक्षया देवधर मुख्य भूमिकेत असून या मालिकेतील राणा दाच्या म्हणजेच हार्दिकच्या फिटनेसवर तर त्याचे चाहते चांगलेच फिदा आहेत. राणाचा फिटनेस फंडा काय आहे हे जाणून घेण्यासाठी ते नेहमीच उत्सुक असतात. 

ऑनस्क्रीन भोळा तसेच रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देतो. त्याचा फिटनेस फंडा शेअर करताना हार्दिक जोशी सांगतो, "मी शूटिंग संपल्यानंतर नियमितपणे जिमला जातो. जिमला जाणं मी कधीच टाळत नाही. चपळपणासाठी मी योगा देखील करतो. राणादा हा एक पेहलवान असल्यामुळे त्याची शरीयष्टी ऑनस्क्रीन चांगली दिसली पाहिजे म्हणूनच व्यायामासोबत डाएटवर देखील मी कटाक्षाने लक्ष देतो. माझ्या रोजच्या आहारात पाव लिटर दूध, १ लिटर ताक, १५-२० अंडी आणि मांसाहार यांचा समावेश असतो. राणादा या व्यक्तिरेखेला सुंदररित्या साकारण्यासाठी हार्दिक घेत असलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे.

या मालिकेत सध्या राजकारणाचे वारे वाहत असून थुरकटवाडीतील सदस्य अंजली आणि नंदिता यांचा प्रचार करण्यासाठी येणार आहेत. 

टॅग्स :तुझ्यात जीव रंगलाहार्दिक जोशीअक्षया देवधर