Join us

‘आई कुठे काय करते’फेम संजनाला मिळाला नवा प्रोजेक्ट, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 18:37 IST

Rupali Bhosale : रूपाली सतत चर्चेत असते. कधी तिच्या फॅशन सेन्समुळे तर कधी सोशल मीडियावरच्या तिच्या फोटोंमुळे. सध्याही रूपाली चर्चेत आहे. कारण काय तर नवा प्रोजेक्ट...

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthey Kay Karte )  या मालिकेतील संजना आता घराघरात पोहोचलीये. होय, आम्ही बोलतोय ते अभिनेत्री रूपाली भोसले  ( Rupali Bhosale) हिच्याबद्दल. ‘आई कुठे काय करते’ रूपाली संजनाची नकारात्मक भूमिका साकारते आहे. 

‘बिग बॉस मराठी’मुळे  रुपाली भोसलेला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता तर रूपाली सतत चर्चेत असते. कधी तिच्या फॅशन सेन्समुळे तर कधी सोशल मीडियावरच्या तिच्या फोटोंमुळे. सध्याही रूपाली चर्चेत आहे. कारण काय तर नवा प्रोजेक्ट. रूपाली लवकरच एका नव्या प्रोजक्टमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे हिंदी टीव्ही जगतातील एका लोकप्रिय अभिनेत्यासोबत ती झळकणार आहे. 

‘तुझसे है राबता’  फेम सेहबान अझीम  (Sehban Azim ) आणि रुपाली भोसले ‘जीव झाला मोगरा’ ( Jeev Zala Mogra) या मराठी म्युझिक व्हिडिओसाठी एकत्र आले आहेत. सेहबान हा हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतला हँडसम हिरो.  ‘तुझसे है राबता’ मध्ये त्याने साकारलेली एसीपी मल्हार राणेची भूमिका चांगलीच गाजली होती.  

नवा प्रोजेक्ट मिळाल्याने रूपाली ‘आई कुठे काय करते’ हा मालिका सोडणार, अशी चर्चा निर्माण झाली होती. पण सध्या तरी असं काहीही नाही.

रुपाली भोसले अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत काम करतेय. मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही तिनं काम केलं आहे. सुमित राघवन यांच्यासोबत ‘बडी दूर से आये है’ही तिची मालिका प्रचंड गाजली होती.रुपाली ‘एका पेक्षा एक’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. मन उधाण वाºयाचे,  कन्यादान अशा अनेक मालिकांमध्ये तिनं काम केलं आहे.  

टॅग्स :रुपाली भोसले