Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तू चाल पुढं' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, वाघमारे कुटुंबाचं नवीन घराचं स्वप्न पूर्ण होणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 13:02 IST

Tu Chal Pudha: 'मन उडू उडू झालं' या मालिकेच्या जागी 'तू चाल पुढं' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

झी मराठी वाहिनीवर मन उडू उडू झालं या मालिकेच्या जागी तू चाल पुढं (Tu Chal Pudha) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पहिल्याच दिवशी मालिकेच्या कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली पाहायला मिळत आहेत. या मालिकेत अश्विनी वाघमारे मयुरी आणि कुहू या तिच्या दोन मुली, नवरा श्रेयस वाघमारे, सासू सासरे, नणंद शिल्पी आणि नंदेचा मुलगा अशी प्रमुख पात्र या मालिकेत दाखवण्यात आली आहेत. नेहमीप्रमाणेच धनश्री काडगावकर हिने विरोधी अभिनयाने नणंदेची भूमिका चोख बजावली आहे. तर दीपा परब हीने अश्विनीचा साधेपणा आणि निरागसपणा सुंदर वठवला आहे. ही नवीन मालिका लोकांचे मन जिंकत आहे.

'तू चाल पुढं' मालिकेत आतापर्यंतच्या भागात तुम्ही पाहिले की एकिकडे नवरा आणि दुसरीकडे मुलीचा वाढदिवस या कात्रीत सापडलेली अश्विनी अखेर तिच्या सेव्हिंगच्या डब्यातले पैसे मयुरीला देते. श्रेयस आपले राहते घर परस्पर विकण्याचा प्लॅन करतो आणि त्याचा फायदा उचलून अश्विनीच्या वाढदिवसानिमित्त आज हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचे श्रेयस कुटुंबाला सांगतो. सगळे खुश होतात मात्र अश्विनी-मयुरीचा चेहरा उतरतो कारण मयुरी आज ठरल्याप्रमाणे मित्रांना पार्टी देणार असते.

अश्विनी तिला सुचवते की तुझ्या मित्र-मैत्रिणींना आपल्या घरी पार्टी देऊन मग तू हॉटेलला ये. मयुरी तिच्या मित्रांसोबत आणि श्रेयस त्याच्या क्लायंटसोबत एकाचवेळी घराकडे निघाले आहेत. श्रेयस ही डील मिळवू शकेल का ? आणि वाघमारे कुटुंबाचं नवीन घराचं स्वप्न पूर्ण होणार का? हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पुढच्या भागात पाहायला मिळेल. 

टॅग्स :झी मराठी