सन मराठीवरील 'तू अनोळखी तरी सोबती' या मालिकेने कमी कालावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. मालिकेतील मुख्य पात्र समीर आणि अर्पिता यांच्या हळुवार फुलणाऱ्या मैत्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दोन अनोळखी व्यक्ती एकमेकांच्या आयुष्यात येणं आणि त्यांचा एकेमकांच्या सोबतीने होणारा प्रवास रंजकतेने या मालिकेतून दाखवला जातोय. मात्र सध्या अर्पिता व समीरची मैत्री सगळ्यांनाच खटकत असल्यामुळे दोघेही एकमेकांशी बोलणं टाळूया असं ठरवतात. तर एकीकडे अर्पिता आणि विराज तर दुसरीकडे समीर आणि राजसी यांच्या लग्नाची लगबग सुरु आहे. अर्पिता व समीर यांनी घरच्यांच्या सुखासाठी मनाविरुद्ध लग्न करण्यासाठी होकार दिला आहे.
नुकताच मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्यामध्ये लग्नाच्या तयारीची धामधूम दिसत आहे. रुखवताची तयारी, साड्यांचा बस्ता, पत्रिका अशा सगळ्या गोष्टींची लगबग सुरू असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. पण या लग्नामुळे अर्पिता खरंच आनंदी आहे का? नेहमीच घरच्यांचा विचार करणाऱ्या अर्पिताच्या नशिबात नक्की काय लिहिलं आहे? नियती अर्पितासाठी नेमकं काय ठरवणार? या सर्व प्रश्नांची उत्तर येत्या ८ मार्चला दुपारी १ व सायं. ७:३० वाजता २ तासांच्या विशेष भागातून पाहायला मिळणार आहेत.
मालिकेत अर्पिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री योगिता चव्हाण याबद्दल म्हणाली की, "मालिकेत खूप मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या अर्पिताचं लग्न पार पडणार आहे. स्वतःचं सुख कशात आहे हे माहिती असूनही अर्पिता फक्त कुटुंबाचा विचार करते, त्यांचा आनंद पाहते. अश्या बऱ्याच मुली असतात ज्या स्वतःच्या मनाविरुद्ध कुटुंबाच्या सुखासाठी लग्नासाठी तयार होतात. पण आता अर्पितासाठी नियतीने काय ठरवलंय हे येत्या ८ मार्चला प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सध्या मालिकेच्या सेटवर प्रचंड आनंदाचं वातावरण, लगबग, लग्नाची तयारी सुरु आहे. त्यामुळे शूटिंग करताना आम्ही सगळे खूप धमाल करतोय. लग्नसोहळा मालिकेत दिसताना सुंदर वाटतो. पण त्यामागे खूप मेहनत असते. यासाठी मालिकेची टीम दिवसरात्र काम करत आहे.ही लग्नसराई संपूर्ण आठवडाभर सुरु असणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना अर्पिता म्हणून मी आग्रहाचं आमंत्रण देतेय. प्रेक्षकांशिवाय हे लग्न पार पडू शकत नाही."
Web Summary : The 'Tu Anolakhi Tari Sobati' series sees Arpita and Sameer's friendship strained. Despite planning separate weddings, a new promo hints at unexpected twists. Arpita's fate and the unfolding drama will be revealed in a special episode, promising significant developments for viewers.
Web Summary : 'तू अनोळखी तरी सोबती' श्रृंखला में अर्पिता और समीर की दोस्ती में तनाव आता है। अलग-अलग शादियों की योजना के बावजूद, एक नया प्रोमो अप्रत्याशित मोड़ों का संकेत देता है। अर्पिता का भाग्य और सामने आने वाला नाटक एक विशेष एपिसोड में प्रकट होगा, जो दर्शकों के लिए महत्वपूर्ण विकास का वादा करता है।