तृप्ती देसाई ‘रिअॅलिटी’ शोमध्ये जाणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 18:13 IST
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याची आॅफर आली असून देसाई एका अटीवर सहभागी ...
तृप्ती देसाई ‘रिअॅलिटी’ शोमध्ये जाणार ?
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याची आॅफर आली असून देसाई एका अटीवर सहभागी होणार असल्याचे समजते. या कार्यक्रमातला बिग बॉसचा आवाज हा महिलेचा हवा, ही अट मान्य असल्यास या कार्यक्रमात सहभाग घेणार असल्याचं तृप्ती देसाई यांनी सांगितलंय. मात्र तृप्ती देसाईंच्या या मागणीवर या शोच्या निमार्त्यांची प्रतिक्रिया काय आहे, ते समजू शकलेलं नाही.बिग बॉस हा रिअॅलिटी शो गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. यंदाच्या वर्षी बिग बॉसचा दहावा सिझन सुरू होणार आहे.